तुळशीच्या लग्नानंतर म्हणजेच दिवाळी संपताच आपल्याकडे लग्नाचा हंगाम सुरू होतो, तर हिवाळ्यात २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत देशभरात जवळपास ३५ लाख लग्न होऊ शकतात, असा अंदाज ‘द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) ने वर्तवला आहे. शिवाय प्रत्येकाला आपल्या लग्नाच्या दिवशी इतरांपेक्षा सुंदर दिसावं आणि चेहऱ्यावर चमक असावी असं वाटतं. आजकाल मेकअप करून प्रत्येकजण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. परंतु, मेकअपशिवाय जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक सुंदरता हवी असेल तर ती कशी आणू शकता, याबाबतची माहिती पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी दिली आहे, ती जाणून घेऊया.

पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी सांगितलेले पाच उपाय –

  • डिटॉक्स वॉटर विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, शरीराला हायड्रेट ठेवते आणि एकूणच निरोगी आरोग्याला प्रोत्साहन देते.
  • भाजलेल्या अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचनाला चालना देतात आणि त्वचेला चमकदार बनवतात.
  • डी-ब्लोटिंग चहा पचनास मदत करतो आणि फुगणे कमी करतो, शिवाय हा चहा वधूंना अधिक आराम देण्यासह आत्मविश्वासात वाढ करण्यास मदत करू शकतो.
  • बीटरूटचा रस हा अँटिऑक्सिडंट्ससह जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला स्रोत आहे, जो चमकदार त्वचा आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
  • ताकामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते, यामध्ये आतड्याच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स असतात, तसेच ते हायड्रेटिंग पेय ठरू शकते.

हेही वाचा- डायबिटीसचा स्त्री व पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नेमका कसा परिणाम होतो? बाळंतपणानंतर काय धोका असतो, वाचा

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी हायड्रेशन अत्यंत महत्वाचे आहे. तसेच त्वचेसाठी कोणत्याही स्वरूपात पाणी उपयुक्त ठरते, असं डॉ. वंदना पंजाबी, त्वचाशास्त्रज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्ट (खार आणि नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल) यांनी सांगितलं. बीटरूटचा रस, अँटिऑक्सिडंट्सने युक्त असतो, तो त्वचेला तेजस्वी बनवतो आणि ताक त्याच्या प्रोबायोटिक्ससह आतड्यांचे आरोग्य वाढवते, असं विधी चावला, फिसिको डाएट आणि एस्थेटिक क्लिनिक या म्हणाल्या.

हेही वाचा- आलिंगन किंवा मिठी मारणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर डॉक्टर वंदना पंजाबी सांगतात की, फळे आणि भाज्यांचा रस सेवन करण्यापेक्षा त्या चावून खाव्यात, कारण यामुळे फळांमध्ये असलेल्या भरपूर फायबर सामग्रीचा आपल्याला फायदा होतो. तसेच बीटरूट, सफरचंद आणि डाळिंब हे लोहाचे समृद्ध स्त्रोत असून ते आपल्या त्वचेला गुलाबी चमक देतात. अंबाडीच्या बिया ओमेगा ३ चा समृद्ध स्रोत असून त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी फायदे त्यामध्ये आहेत. दही आणि ताकामध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सचे भरपूर स्रोत आहेत. ते मुरुम, एक्जिमा आणि रोसेसिया इत्यादी त्वचेसंबंधित समस्या टाळण्यासह त्वचेच्या काळजी घेण्यास मदत करतात, असंही डॉक्टर पंजाबी यांनी सांगितलं.