हिवाळ्यामध्ये हवेमधील आर्द्रतेचे प्रमाण घटल्यामुळे (३० टक्क्यांहून कमी झाल्यामुळे) ती हवा सुखावह वाटते. मात्र ती हवा कोरडी असते. थंडीतली ती कोरडी हवासुद्धा आरोग्याला बाधक होऊ शकते. जेव्हा कमी आर्द्रता (ओलावा) असलेली अशी थंड-कोरडी हवा नाकामधून आत शिरून उर्ध्व श्वसनमार्गामध्ये जाऊन पोहोचते, तेव्हा त्या थंड हवेमुळे नाकामधील श्लेष्मल आवरण (आतील बुळबुळीत आवरण) थंड पडून त्याखालील शींरांचे आकुंचन होते, जे विविध समस्यांना कारणीभूत ठरते.

त्या गार हवेमुळे नाकाचे आतील आवरण, किंबहुना संपूर्ण श्वसनमार्ग थंड पडू नये म्हणून त्या हवेला गरम करण्याचा प्रयत्न शरीर करत असते. ज्यामुळे घशामधील हवेचे तापमान ३० अंश फॅरेन्हाईटपर्यंत पोहोचते. अशा गरम हवेची आर्द्रतेला धरुन ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने ती हवा बाहेर पडताना आपल्यासोबत शरीरातील आर्द्रतासुद्धा बाहेर फेकते. दुर्दैवाने त्या आर्द्रतेबरोबर श्वसनमार्गाला अत्यावश्यक स्त्रावामधील ओलावासुद्धा बाहेर फेकला जातो, ज्यामुळे श्वसनमार्ग हळुहळू कोरडा पडत जातो.(त्या व्यक्तीने त्याच दरम्यान कमी प्रमाणात द्रवपदार्थांचे प्राशन, कमी प्रमाणात तेलतूपाचे सेवन, थंड-कोरड्या गुणांचा आहार अधिक खाणे, रात्री जागरण अशा चुका केल्यास) श्वसनमार्गाचा कोरडेपणा अधिकच वाढून घशाची खवखव, घसादुखी, कोरडा खोकला अशा लक्षणांना हे सारे कारणीभूत ठरते.

sea level rise
समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

हेही वाचा : लसणाची पाकळी नाकपुडीत घालून ‘इतका’ वेळ ठेवल्यास नाक चोंदणे, सर्दी लगेच बरी होते का? तज्ज्ञांनी सांगितला उपाय

सर्दी हा होते?

श्वसनमार्ग, विशेषतः उर्ध्व श्वसनमार्ग थंड व कोरडा पडतो, तेव्हा त्या स्थितीमध्ये श्वसनमार्ग आपला श्लेष्मल स्त्राव वाढवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे नाक वाहू लागते, त्याला आपण ‘सर्दी’ म्हणतो. सर्दी ही वास्तवात शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्रिया आहे, जी एकीकडे उर्ध्व श्वसनमार्गाचा कोरडेपणा कमी करण्यास तर दुसरीकडे शरीराचे तापमान संतुलित करण्यास साहाय्यक होते. हिवाळ्यात शरीरामध्ये वाढलेला थंडावा अधिकच्या स्रावावाटे बाहेर फेकण्याचा प्रयत्न शरीर करत असते.

नाकावाटे जंतूसंसर्ग

हिवाळ्यात शरीरातून श्वसनावाटे ओलावा अधिक प्रमाणात फेकला जात असल्याने (आणि त्यात अधिक त्या व्यक्तीचे जलप्राशन किंवा ओलावा पुरवणार्‍या पदार्थांचे सेवन कमी असल्यास आणि त्याला थंड, गोड, बुळबुळीत पदार्थांच्या सेवनाची जोड दिल्यास) शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने, ओलाव्या अभावी नाकातून वाहणारा स्त्राव पातळ न होता थोडा चिकट, बुळबुळीत व घट्‍ट असा तयार होतो आणि आपण म्हणतो “नाकातून शेंबूड येत आहे”. चिकटपणामुळे नाकातला स्त्राव सहजगत्या बाहेर फेकला जात नसेल तर नाक चोंदते व नाकातून हवा नीट शिरू न शकल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. त्यात अधिक हवा खूप थंड व कोरडी असेल (आणि त्यात त्या व्यक्तीने अल्प द्रवसेवनाची व कोरड्या गुणांच्या आहाराची जोड दिल्यास, श्वसनमार्गावर, त्यातही नाकावर कोरड्या हवेचा सतत मारा होत असल्यास श्वसनमार्गात कोरडेपणा अधिकच वाढून ) नाकामधील स्त्राव पूर्णपणे सुकून नाकाच्या आत स्त्रावाच्या खपल्या चिकटतात व तेव्हा नाक चोंदते व दुखू लागते. याउलट स्त्राव अधिक प्रमाणात बाहेर पडत असेल व तिथे जंतुसंसर्ग झाल्याने नाकावाटे घट्‍ट व हिरवट-पिवळा स्त्राव येत असेल तर त्याला आपण ‘पिकलेली सर्दी’ म्हणतो.

हेही वाचा : डार्क चॉकलेटमुळे रक्तदाबाचा धोका होतो कमी? दररोज किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर? डॉक्टर म्हणाले…

खोकला का होतो?

चेहर्‍याच्या पोकळ्यांवर (सायनसेसवर) थंड व कोरड्या हवेचा सतत दीर्घकाळ मारा होत असल्यास (आणि त्यात अधिक ती व्यक्ती दूधदुभते, गोड, बुळबुळीत पदार्थ वगैरे कफवर्धक पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करत असल्यास) सायनसेसमध्ये व नाकामध्ये अधिक कफ जमतो, जो स्त्राव घशाच्या मागून श्वासनलिकेत उतरू लागतो, तेव्हा त्या चिकट स्त्रावाला बाहेर काढण्यासाठी शरीराला उर्ध्वदिशेने वेगाने जोर लावावा लागतो, ज्याला आपण ‘खोकला’ म्हणतो. या स्थितीमध्ये थंड हवेचा संपर्क तसाच पुढे सुरु राहिल्यास (त्यात अधिक त्याला कफवर्धक आहाराची, दिवसा झोपण्याची, व्यायाम न करण्याची जोड मिळाल्यास) कफाच्या या स्त्रावामध्ये जंतुसंसर्ग होतो आणि कफाचा स्त्राव हिरवट-पिवळ्या रंगाचा होतो. कफस्रावामधील जंतूंचे प्रमाण वाढत गेल्यास त्या जंतूंचा नाश करण्यासाठी त्यांच्याबरोबर पांढर्‍या पेशींची जी लढाई होते,त्या लढाईचा प्रयत्न म्हणून शरीराचे तापमान वाढवले जाते त्याला आपण ‘ताप’ म्हणतो.

हेही वाचा : Health Special : शालेय वयातील वाढ आणि मनोविकास

उपाय काय?

हे झाले थंडीमध्ये, त्यातही कडक थंडीमध्ये होणार्‍या सर्दी, कफ, खोकला, तापामध्ये प्रत्यक्षात काय होते हे दर्शविणारे संक्षिप्त चित्र. या सर्व स्थितीचा सामना करण्याचा सोपा प्रयत्न आयुर्वेदाने सांगून ठेवला, तो म्हणजे थंड, गोड, बुळबुळीत अशा गुणांचा कफवर्धक आहार टाळणे. याउलट आहार उष्ण घेणे, उष्ण गुणांचे द्रवपदार्थ पित राहणे, दिवसभरातून गरम पाणी पिणे आणि गरम पाण्याची वाफ घेणे. जे घशाला कोरडा पडू देत नाही, तिथले तापमान थंड होऊ देत नाही, श्लेष्मल स्त्रावाला बुळबुळीत होऊ देत नाही, स्त्राव पातळ करून त्याला बाहेर फेकण्यास साहाय्य करते, रोगजंतुंची वाढ व प्रसार रोखते आणि कफाचा त्रास कमी होतो.