How Much Sleep Do I Need By Age : आपल्यातील अनेकांना झोप म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. कोणाला पडल्या पडल्या झोप लागते; तर कोण रात्रभर तळमळत राहतो. पण, तुम्हाला माहीत आहे का झोप पूर्ण नाही झाल्यावर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. तर याचबद्दल आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…
स्वच्छ खाणे आणि नियमित व्यायाम यांसारख्या निरोगी जीवनशैलीसाठी आर. माधवनची वचनबद्धता तरुण आणि वृद्धांना प्रेरणा देते. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सिड वॉरियर यांच्याशी अलीकडेच झालेल्या संभाषणात, ५४ वर्षीय अभिनेता आर. माधवनने नवीन गोष्टी शिकल्या, ज्यामध्ये चांगल्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची सवय समाविष्ट करण्यात आली होती.
झोप ही ‘आरोग्यावर केलेली एक सर्वांत मोठी गुंतवणूक आहे’ (highest ROI on health), असे तज्ज्ञांनी नमूद केले. highest ROI on health म्हणजे जसे की व्यायाम, योग्य आहार, झोप, ध्यान यातून तुमच्या शरीराला सर्वांत जास्त फायदा होतो. जर तुमच्या मेंदूला चांगली झोप मिळाली, तर ती तुम्हाला परत मिळणारी सर्वांत मोठी गुंतवणूक ठरू शकते.
डॉक्टर वॉरियर यांच्या मते, जर तुम्ही एक दिवस झोप चुकवली, तर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. तुमचा मेंदू बरा होऊ शकतो. कारण- तुमचा मेंदू लवचिक असतो. पण, जर तुम्हाला दोन किंवा पाच वर्षे झोप चांगली घेतली नसेल, तर येथूनच समस्यांना सुरुवात होते, गोष्टी वाढतात आणि नंतर शेवटी तुमच्या मेंदूला इतके नुकसान होते की,तुम्हाला अल्झायमर रोग (न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरपैकी एक ) किंवा तुमची स्मरणशक्ती कमी होते.
तर असे का घडते हे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि अपूर्ण झोप मेंदूच्या आरोग्यावर किती परिणाम करू शकते हे शोधून काढले…
जर तुम्ही वर्षानुवर्षे पुरेशी झोप घेतली नाही, तर काय होईल (What Happens If You Don’t Sleep Enough For Years)
हेल्थ अँड वेलनेस कोच महालक्ष्मी के. म्हणाल्या की, झोपेची कमतरता आणि झोपेचा त्रास हे विविध आरोग्य समस्यांशी जोडले गेले आहेत, ज्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य, हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका यांचा समावेश असतो. फक्त चार तासांच्या झोपेनंतर रक्तदाब वाढतो, पॅरासिम्पेथेटिक टोन कमी होतो आणि कॉर्टिसोल (तणाव संप्रेरक) पातळी व ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो.
ठरलेल्या वेळेपेक्षा कमी झोप घेतल्याने लेप्टिनची पातळी कमी होते, जो भूक कमी करणारा चरबीयुक्त उतींमधील संप्रेरक आहे. त्याचबरोबर यामुळे घ्रेलिनची पातळी जास्त असते, जी भूक वाढवते आणि लठ्ठपणा निर्माण करते. त्यामुळे अॅलोस्टॅटिक ओव्हरलोड म्हणजेच रक्तदाब आणि तापमान नियंत्रित करून पर्यावरणीय मागण्यांचा अंदाज घेण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची शरीराची क्षमता कमी होऊ शकते, जे तुमच्या नियमित आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, असे महालक्ष्मी म्हणाल्या आहेत.
मग पुरेशी झोप कशाला म्हणतात? (What Is Enough sleep)
सफदरजंग रुग्णालयातील सहायक प्राध्यापक डॉक्टर श्रेष्ठ गुप्ता म्हणाल्या की, झोपेच्या गरजा व्यक्तीपरत्वे बदलतात आणि झोप ही अशी अवस्था आहे की, ज्यामध्ये शरीर स्वतःची दुरुस्ती आणि स्वतःला पुनरुज्जीवित करतो. त्यामुळे आदर्श झोपेचा कालावधी वयावर अवलंबून असतो. मुलांसाठी १६ ते २० तास, प्रौढांसाठी सर्कॅडियन लय राखण्यासाठी रात्री सहा ते आठ तासांची झोप महत्त्वाची असते.
कमी झोपेमुळे हार्मोनल असंतुलन, कॉर्टिसोलची पातळी वाढणे व झोपताना डोळ्यांच्या जलद हालचाली (रॅपिड आय मूव्हमेंट -REM) बिघाड होतो. त्यामुळे अल्पावधीत चिडचिडेपणा व थकवा येऊ शकतो आणि दीर्घकालीन परिणामांमध्ये मूड बदल, वाढ खुंटणे, उत्पादकता कमी होणे, वृद्धत्वाची सुरुवातीची लक्षणे यांचा समावेश होतो.
पहाटे २-४ च्या सुमारास लोक जी चांगली ‘रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप’ (REM sleep) घेतात, त्याचे महत्त्व स्पष्ट करताना डॉक्टर गुप्ता म्हणाले की, रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप स्मृती मजबूत करणे, भावनिक प्रक्रिया करणे, मेंदूचा विकास सुधारतो आणि आपल्याला बराच वेळ जागे राहण्यासाठी तयार करते. रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप दुखापती दुरुस्त करण्याशी आणि मजबूत रोगप्रतिकार शक्तीशीदेखील संबंधित आहे.