Soaked Ajwa Dates With Cold Milk Benefits : जुने ते सोने असे म्हणतात. आजीचे अनेक उपाय आजही आपण अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरत आहोत. त्यामध्ये जखमेवर हळद लावणे, ताप आल्यावर चंदन लावणे आणि रिकाम्या पोटी काळ खजूर थंड दुधात भिजवून त्याचे सेवन करणे यांचा समावेश असतो. काळ खजूर केवळ स्वादिष्टच नाहीत तर दुधासोबत खाल्ल्यास ते विविध आरोग्य फायदे देतात असे मानले जाते. पण, थंड दुधात काळ खजूर मिसळण्यापूर्वी रात्रभर भिजवून ठेवा; ज्यामुळे त्याचे पोषण वाढते आणि सेवन करण्यासाठीही सोपे ठरते. विशेषतः जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी त्याचे सेवन करता.

रिकाम्या पोटी काळ खजूर दुधात भिजवून खाल्यास नेमकं काय होतं? (Benefits Of Eating Dates With Milk)

डायट क्लिनिक्समधील आयुर्वेदिक डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञ डॉक्टर अंजना कालिया यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, खजुरात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारख्या पोषक तत्वे असतात; जे फायबरचा उत्तम स्रोत देखील आहेत. काळे खजूर रिकाम्या पोटी, विशेषतः रात्रभर दुधात भिजवून ठेवल्यानंतर खाल्यास शरीराची ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.

लोहाची कमतरता असलेल्या लोकांना (ज्यांना मधुमेह नाही) रिकाम्या पोटी हे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. कारण काळे खजूर लोहाची पातळी वाढवण्यास मदत करू शकतात. याव्यतिरिक्त काळे खजूर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असल्याने महत्त्वाच्या अवयवांच्या शुद्धीकरणाला सपोर्ट सुद्धा करतात आणि हृदयाच्या आरोग्याला चांगले प्रोत्साहन देतात.

याबद्दल दिल्लीस्थित वैयक्तिक प्रशिक्षक आणि कार्यात्मक पोषणतज्ज्ञ दीपिका शर्मा म्हणतात की, भिजवलेले काळे खजूर मऊ आणि अधिक पचण्याजोग्या असतात. शिवाय, त्यात विरघळणारे फायबर सुद्धा असतात. थंड दूध आरामदायी वाटू शकते जोपर्यंत तुमचे पोट अस्वस्थ वाटत नाही.

पचन, ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते – डॉक्टर कालिका म्हणतात की, थंड दुधात भिजवलेले काळे खजूर दिवसाची सुरुवात पौष्टिकतेने करण्यास मदत करतात. कारण – काळ्या खजूरमध्ये नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. तर दुधात प्रथिने आणि कॅल्शियम असतात; जे पचनास मदत करतात, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात.

तर पोषणतज्ज्ञ दीपिका शर्मा म्हणाले की, आयुर्वेदात सामान्य जीवनशक्तीसाठी खजूरांना फार पूर्वीपासून महत्त्व दिले आहे. पण, त्याचे फायदे सखोलपणे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.

थंड दुधात काळे खजूर भिजवून कोणी टाळावे? (Who Should Avoid Consuming Ajwa Dates In Cold Milk)

डॉक्टर कालिया यांचे म्हणणे आहे की, मधुमेहींनी जास्त प्रमाणात काळे खजूर खाणे टाळावे. कारण – त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात खजूर समाविष्ट करताना त्यांच्या रक्तातील साखरेचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ज्यांना लॅक्टोज इन्टॉलरन्स आहे त्यांनी दुधासोबत काळे खजूर खाणे टाळावे. कारण – त्यामुळे पचनक्रियेत त्रास होऊ शकतो. त्याऐवजी रात्रभर २ ते ३ खजूर पाण्यात भिजवू शकता. त्यानंतर सकाळी त्याचे सेवन करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोषणतज्ज्ञ दीपिका शर्मा म्हणतात की, तुम्हाला काळे खजूर आणि थंड दूध या मिश्रणात भरपूर कॅलरीज आहेत. त्यामुळे संतुलन न ठेवता कालांतराने हळूहळू वजन वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय जर तुम्हाला मूत्रपिंडाच्या समस्या आणि आयबीएस किंवा कमी पोटॅशियम आहार घेत असाल तर काळे खजूर हा बेस्ट पर्याय असू शकतो. त्यामुळे खजुराबरोबर थंड दूध पिणे काही लोकांमध्ये पचनक्रिया बिघडवू शकते. विशेषतः रिकाम्या पोटी जर तुम्ही सेवन केले तर…