Warm vs cold hands: which is better? तुम्हाला माहीत आहे का की, तुमचे हात तुमच्या आरोग्याबद्दल माहिती देऊ शकतात? हो, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या हातांचे तापमान आपल्या आतड्याच्या आरोग्याबद्दल अप्रत्यक्ष, परंतु अर्थपूर्ण माहिती देऊ शकते. विशेषतः रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेच्या संतुलनावर त्याचा प्रभाव पडतो.

“उदाहरणार्थ- प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आतड्यांतील जीवाणूंमध्ये येणारे व्यत्यय – जसे की अँटीबायोटिक वापरामुळे – शरीराच्या तापमानात मोजता येण्याजोगी घट होऊ शकते. हे संशोधन प्रामुख्याने अंतर्गत तापमान नियमनावर लक्ष केंद्रित करीत असले तरी हातपायांची उष्णता किंवा थंडपणा हे शारीरिक स्थितींचे बाह्य प्रकटीकरण असू शकते, ज्यामध्ये आतड्याच्या आरोग्याशी संबंधित स्थितींचा समावेश आहे.

उबदार की थंड हात : कोणते चांगले?

दीपलक्ष्मी यांच्या मते, सतत उबदार हात हे सामान्यतः चांगले लक्षण आहे. ते रक्ताभिसरण आणि स्वायत्त मज्जासंस्थेचे लक्षण मानले जाते. हे सर्व निरोगी आतड्यांमुळे प्रभावित होते. दुसरीकडे सतत थंड हात असणे म्हणजे खराब रक्त प्रवाह, वाढलेला ताण प्रतिसाद किंवा चयापचय विकार दर्शवू शकतात. अशा परिस्थितीत आतड्यांमधील असंतुलन वाढू शकते. हाताच्या तापमानाकडे कधी कधी उर्जेच्या प्रवाहाचे आणि भावनिक स्थितीचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते. थंड हात भावनिक आकुंचन किंवा मज्जासंस्थेचा अतिरेक दर्शवू शकतात आणि उबदार हात मोकळेपणा, चैतन्य व संतुलन दर्शवू शकतात.

चेन्नईतील प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या की, हातांचे तापमान पचनाच्या समस्यांशी संबंधित असल्याचे म्हटले जात असले तरी, ते इतर विविध कारणांमुळेदेखील असू शकते.

१. थंड हात : ते रक्ताभिसरण बिघडलेले किंवा थायरॉईड फंक्शनसारख्या समस्या दर्शवू शकतात.

२. गरम हात : उबदार, लालसर त्वचा पचनाच्या समस्यांशी संबंधित असू शकते. हे इतर आरोग्य परिस्थितींमुळेदेखील होऊ शकते. इतर कारणांमध्ये उदा. उबदार हवामान, व्यायाम व उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे.

३. घाम येणारे हात : हा हायपरहायड्रोसिस नावाचा आजार आहे, जो घामाच्या ग्रंथींच्या अतिक्रियाशीलतेमुळे होतो. मधुमेह आणि थायरॉईड विकार किंवा काही औषधे घेतल्यानेदेखील हा आजार होऊ शकतो.

४. तळहातांना कोरडेपणा व खाज सुटणे : बद्धकोष्ठता, पोटफुगी व अतिसार यांसारख्या आतड्यांशी संबंधित समस्यांमुळे तुमच्या तळहातांना कोरडेपणा व खाज येऊ शकते. हे यकृताचे आजार, थायरॉईड विकार, त्वचेची अॅलर्जी किंवा संसर्गामुळेदेखील होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हाताचे तापमान हे केवळ आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित नसले तरी तो एक संकेत आहे. विशेषतः जेव्हा पचनक्रिया बिघडते, थकवा किंवा तणाव येतो. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.