मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही करू नका 'हे' पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक | Which food should be avoided heating in a microwave oven can increase bacteria and be harmful for health | Loksatta

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चुकूनही करू नका ‘हे’ पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

मायक्रोवेव्हमध्ये कोणते पदार्थ गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते जाणून घ्या

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चुकूनही करू नका ‘हे’ पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
मायक्रोवेव्हमध्ये कोणते पदार्थ गरम करणे टाळावे जाणून घ्या (फोटो : Freepik)

अनेक घरांमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला जातो. एखादा खाद्यपदार्थ पटकन गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला जातो. पण यामध्ये पदार्थ गरम करण्यासाठी बनवण्यात आलेल्या यंत्रणेमुळे काही पदार्थांची पौष्टिकता कमी होऊन ते पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे काही पदार्थ मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम न करण्याचा सल्ला दिला जातो. कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुढील पदार्थ गरम करणे टाळा

आणखी वाचा: अति दूध प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या याचे योग्य प्रमाण

भात
भात बनवल्यानंतर लगेच थंड होतो आणि त्याची चव कमी होते, म्हणून काहीजण भात खाण्यापुर्वी तो मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करतात. पण यामुळे त्यातील बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये भात गरम करणे टाळावे.

बटाट्याची भाजी
मायक्रोवेव्ह ओव्हनमधील गरम वातावरणामुळे बटाट्यातील बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. यामुळे फुड पॉयजनिंग देखील होऊ शकते. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये बटाट्याची भाजी गरम करणे टाळा.

अंडी
अंडी किंवा अंड्याचे पदार्थ मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम केल्यास त्यातील बॅक्टेरिया वाढू शकतात त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अंडी किंवा अंडयांचे पदार्थ गरम न करण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा: सतत होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं लगेच जाणून घ्या

चिकन
अनेकांना रात्रीच्या जेवणातील उरलेले चिकन दुसऱ्या दिवशी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून खाण्याची सवय असते. पण हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण चिकनमध्ये असणारे प्रोटीन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम केल्यानंतर टॉक्सिक होऊ शकते, ज्यामुळे फूड पॉयजनिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चिकन गरम करणे टाळा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 10:29 IST
Next Story
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही