दिवसाची सुरवात ही पोटभरीचा नाश्त्याने करावी असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. उपमा, पोहे, हे पदार्थ आपण नात्याला अगदी हमखास खातो. मात्र नाश्ता नुसता पोटभरीचा असून फायदा नसतो, तर तो पौष्टिक असणेही तितकेच आवश्यक आहे. असा दिवसभर ऊर्जा देणारा आणि आरोग्याची काळजी घेणारा पदार्थ तुम्ही शोधात असाल तर ओट्स इडलीची रेसिपी बनवून पाहू शकता.

ही पौष्टिक इडलीची रेसिपी गुरुग्राममधील मॅरियटच्या कोर्टयार्ड रेस्टोरंटचे हेड शेफ अमित दाश [amit dash] यांनी ही रेसिपी शेअर केली आहे, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखावरून समजते. ओट्स इडली तयार करण्यासाठी काय साहित्य आणि कृती आहे ते पाहू.

हेही वाचा : Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण

ओट्स इडली रेसिपी

साहित्य

पांढरी उडीद डाळ – १०० ग्रॅम
इडली रवा – २०० ग्रॅम
ओट्स – ५० ग्रॅम
मीठ
पाणी

कृती

सर्वप्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून ६ ते ८ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.
भिजवलेली डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यावी.
आता इडली रवा १० मिनिटांसाठी भिजवून घ्या. आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या उडीद डाळीच्या मिश्रणात मिसळून घ्यावे.
तयार होणाऱ्या इडलीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. आता काही वेळासाठी इडलीचे पीठ झाकून बाजूला ठेवून द्या.
इडलीचे पीठ छान फुलून आल्यानंतर त्यामध्ये छान ढवळून घ्या.

हेही वाचा : द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता इडली पात्राला थोडेसे तेल लावून त्यामध्ये तयार केलेले इडलीचे पीठ ओतून घ्यावे. त्यावर थोडे ओट्स घाला.
साधारण १० ते १२ मिनिटांनी आपल्या इडल्या तयार होतील.
तयार झालेली ओट्स इडली खोबऱ्याच्या किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर खावी.