संडे असो वा मंडे, रोज खा अंडे, असे सांगितले जाते. प्रोटीनचा सर्वांत उत्तम स्रोत म्हणजे अंडे. अंड्यामुळे तुम्हाला जास्त व्हिटॅमिन मिळते. अंडे खाल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. शिवाय कमी होण्यास मदत मिळते. आपल्या मेंदूसाठी अंडे अधिक फायदेशीर आहे. आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी बहुतांश जण आवर्जून आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात.

अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश आहे, जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि शरीर फिट ठेवण्याचं कार्य करतात; मात्र, अंडे कोणत्या रंगाचे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत, हे तुम्हाला माहिती आहे काय, इंडियन डायटेटिक असोसिएशनच्या डॉ. मिकिता गांधी यांनी कोणत्या रंगाचे अंडे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या रंगाचे अंडे आपण खाल्ले पाहिजे.

डॉ. मिकिता गांधी सांंगतात…

अंड्यांचे पौष्टिक स्वरूप कमी-अधिक प्रमाणात सारखेच असते. बहुतेक लोक पांढऱ्या अंड्यांऐवजी तपकिरी अंडी खाण्यास प्राधान्य देतात. कारण, त्यांना वाटते की ते निरोगी आणि सेंद्रिय आहेत. मिकिता गांधी म्हणाल्या की, शेलचा रंग काहीही असो, दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये पौष्टिकता सारखीच असते. तपकिरी अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा जास्त महाग असतात कारण तपकिरी अंडी देणारी कोंबडी कमी अंडी घालते. त्यामुळे त्याचा विक्री खर्च वाढल्याने त्याची महागडी विक्री होते. ते म्हणाले की, जर कोणी मांसाहारी असेल तर तो पांढरी आणि तपकिरी अशी दोन्ही अंडी खाऊ शकतो आणि दोन्हीमध्ये जवळपास सारखेच पोषक घटक आढळतात.

(आणखी वाचा : हिवाळ्यात स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ खबरदारी; जाणून घ्या! )

अंड्याचा रंग कोंबडीच्या पिसाच्या रंगावरून समजतो

अंड्याचा रंग कोंबडीच्या पिसाच्या रंगावरून ठरवला जातो. जर कोंबडीला ब्राऊन पिसे असतील तर तिची अंडी ब्राऊन असतील. दुसरीकडे, जर पांढरी पिसे असलेली कोंबडी असेल तर तिची अंडी पांढरी असतील. अंड्याच्या कवचाचा रंग कोंबड्यातून निर्माण होणाऱ्या रंगद्रव्यांवर अवलंबून असतो, जे प्रामुख्याने प्रोटोपोर्फिरिन असते.

अंडी ताजी असणे आवश्यक आहे. अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत. अंडी बाहेर टाकल्यास ते टाळावे असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एकंदरीत अंड्यांचा रंग नसून अंड्यांचे पोषण हे कोंबड्याच्या आहारावर अवलंबून असते. जर कोंबड्या नेहमी सूर्यप्रकाशात असतात आणि चांगले अन्न खातात, तर त्यांची अंडी अधिक पौष्टिक असतील. दुसरीकडे, कोंबड्यांना नेहमी बंद खोलीत ठेवले आणि त्यांचे अन्न चांगले नसेल तर अंडी निरोगी राहणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.