डॉक्टर अविनाश सुपे
जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठया आतडयांचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामानाने आशिया, आफ्रिका खंडामध्ये कमी आहे. परंतु हल्ली ज्या ज्या देशांमध्ये पाश्चिमात्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे, त्या देशामध्ये मोठया आतडयाच्या कर्करोगाचे प्रमाणसुध्दा वाढत आहे.

मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव. ज्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला कचरा किंवा मल साठवलेला असतो. मोठया आतडयाचा कर्करोग हा आतडयाच्या आतील आवरणांपासून सुरु होतो व तेथून पुढे पसरतो. अनेकदा मोठया आतडयांमध्ये छोटया छोटया गाठी आढळून येतात. हे Polyps सुरुवातीस कर्करोगाचे नसतात. परंतु अनेक वर्षे तसेच आतडयांमध्ये राहिल्यास त्याचे परिवर्तन कर्करोगामध्ये होऊ शकते, म्हणून अनेकदा Surgeons – Colonoscopy (दुर्बिणीचा तपास) करताना हे Polyps आढळल्यास काढून टाकतात असे Polyps काढून ते तपासणीस पाठवून त्यात कर्करोग आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाते. मोठ्या आतड्यातील कर्करोग ही पेशींची वाढ आहे. मोठे आतडे हा पाचन तंत्राचा शेवटचा भाग आहे. पाचक प्रणाली शरीराला वापरण्यासाठी अन्न खंडित करते.

Women at workplace
लैंगिक समानता असलेल्या कंपन्यांमध्ये महिला असतात अधिक प्रामाणिक, सर्वेक्षणातून अनेक खुलासे समोर!
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा

हेही वाचा : Health Special : संगीत आणि मानसिक स्वास्थ्य

मोठ्या आतड्यातील कर्करोग सामान्यत: वयस्क लोकांना होतो पण कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. हे सहसा कोलनच्या आत तयार होणार्‍या पॉलीप्स नावाच्या पेशींच्या लहान गुठळ्यांपासून सुरू होते. पॉलीप्स सामान्यतः कर्करोगजन्य नसतात, परंतु काही कालांतराने कोलन कर्करोगात बदलू शकतात. पॉलीप्समुळे सहसा लक्षणे उद्भवत नाहीत. या कारणास्तव, कोलनमधील पॉलीप्स शोधण्यासाठी डॉक्टर नियमित तपासणी, चाचण्यांची शिफारस करतात. पॉलीप्स शोधणे आणि काढून टाकणे कोलन कर्करोग टाळण्यास मदत करते.

हा कर्करोग जरी संसर्गजन्य नसला तरी अनुवांशिक आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात हा आजार झाला तर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना (भावंडे, मुले इ.) हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

आतडयाचा कर्करोग होण्याची कारणे –

असमतोल आहार –स्निग्ध पदार्थ म्हणजेच चरबी (फॅट) जास्त असलेला आहार वा कर्करोगास आमंत्रित करतो. ज्या देशामध्ये जास्त चरबीयुक्त आहार घेतला जातो, तिथे या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळते. स्निग्ध (फॅट) पदार्थांच्या पचनक्रियेनंतर जे अंतिम घटक तयार होतात ते Carcinogenic म्हणजेच कर्करोगास आमंत्रण देतात.
याउलट ज्या आहारामध्ये खूप प्रमाणात फळे, भाज्या, पालेभाज्या व फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो (उदा. भारतीय चौरस आहार) त्या देशात/त्या व्यक्तींना हा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

हेही वाचा : आरोग्य वार्ता : झोपेतील छोटयाशा व्यत्ययाचाही मन:स्थितीवर वाईट परिणाम

मोठया आतडयातील गाठी Polyps

हे Polyps (गाठी) जरी बऱ्याचदा कर्करोगाच्या नसल्या तरी काही वर्षांनी पुढे जाऊन त्याचे रुपांतर कर्करोगामध्ये होऊ शकते.

मोठया आतडयाचे काही आजार

Ulcerative Colitis (कोलायटीस), Familiar Polyposis (कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मोठया आतडयात खूप गाठी असणे) हे आजार रुग्णांना अनेक वर्ष असतात. हे आजार ज्या रुग्णांना अनेक वर्षे असतात त्यांना मोठया आतडयाचा कर्करोग होण्याची शक्यता दसपटीने वाढते.

अनुवंशिकता व जनुकांचा प्रभाव

कुटुंबामध्ये म्हणजेच रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाला मोठया आतडयांचा कर्करोग झाला असेल तर हा कर्करोग इतर व्यक्तींना होऊ शकतो. अशा व्यक्तींनी तसेच ज्यांना Ulcerative Colitis (10 वर्षांपेक्षा जास्त) असेल तर वर्षातून एकदा सर्जनकडून वा दुर्बिणीद्वारे मोठया आतडयाची तपासणी करणे आवश्यक असते.

हेही वाचा : Health Special : सर्वोत्तम देहबल कधी असते?

या आजाराची लक्षणे काय असू शकतात ?

या कर्करोगाची विविध लक्षणांपैकी थकवा, अशक्तपणा 2) शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे म्हणजे जी व्यक्ती रोज सकाळी शौचास जाते त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा शौचाला जायला लागणे वा संडास दोन-चार दिवसातून एकदा होणे 3) पातळ संडास होणे किंवा बध्दकोष्ठतेचा त्रास सुरु होणे 4) संडास पहिल्यापेक्षा अरुंद होणे 5) संडासावाटे रक्त जाणे 6) वजन घटणे, पोटात दुखू लागणे वा पोट फुगल्यासारखे वाटणे.

मोठया आतडयाच्या कर्करोगाची लक्षणे आजार सुरु झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर जाणवायला लागतात. कर्करोग पोटात कुठल्या भागात आहे, यावरुन लक्षणे बदलू शकतात. कर्करोगाची गाठ जर उजव्या बाजूला आतडयात असेल तर हे आतडे मोठे असल्याने कॅन्सरची गाठ खूप मोठी झाल्याशिवाय त्रास सुरु होत नाही. त्यामुळे हा आजार फार उशिरा लक्षात येतो. या कर्करोगामध्ये बराच काळ संडासावाटे रक्त जाऊन त्या रुग्णामध्ये अनेमिया (रक्त कमी होण्याची) लक्षणे म्हणजेच थकवा, दम लागणे इ. दिसतात.

तपासण्या कोणत्या कराव्यात ?

रुग्णास जेव्हा मोठया आतडयाचा कर्करोग असण्याची शक्यता वाटते तेव्हा पुढील तपासण्या कराव्या.
Colonoscopy यामध्ये एक नळी (दुर्बिण) संडासच्या जागेमधून मोठया आतडयांपर्यंत आत टाकली जाते व आतडे आतून पूर्णपणे पाहून घेतले जाते. काही संशयास्पद आढळल्यास वा Polyps आढळल्यास ते काढून बाहेर घेतले जातात व पॅथॉलॉजिस्ट कडून कॅन्सरसाठी तपासून घेतले जातात.

सीटी स्कॅन – (CT Scan) आतड्याचा कॅन्सर कुठे व किती पसरलाय हा तपास केला जातो.
Ba Enema – बेरीयम नावाचे पांढर औषध एनिमाद्वारे मोठया आतडयात टाकून एक्स-रे काढणे. दुर्बिणीच्या तपासामुळे हल्ली याची आवश्यकता कमी पडते.

हेही वाचा : Health Special : अष्टपैलू राजगिरा

मोठया आतडयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी?

योग्य आहार घ्यावा, ज्यात पालेभाज्या, सलाड, तंतुमय पदार्थ म्हणजे कोंडा न काढता केलेल्या चपात्या, पॉलिश न केलेले तांदूळ वगैरे अन्न घ्यावे, चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करावे, तेल, अंडी, मटण, चीज, बटर.
पन्नाशी नंतर प्रत्येकाने दरवर्षी किंवा संडासाच्या सवयीत बदल झाल्यास आपले संडास तपास करुन त्यातून रक्त जात नाही ना हे पाहावे तसेच संडासची जागा आतून तपासून घ्यावी. कॅन्सर रुग्णाच्या फॅमिलीमध्ये कुणी संशयास्पद असेल तर त्याच्या रक्त, लघवी, संडासचा तपास करुन घ्यावा. सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, तपास इ. जरुरीप्रमाणे करुन घ्यावे.

उपाययोजना

योग्य उपाययोजना जर योग्य वेळेत झाल्या तर मोठया आतडयाच्या कर्करोगाचे रुग्ण अनेक वर्षे चांगले राहू शकतात, म्हणूनच कर्करोगाचे लवकर निदान हे महत्वाचे ठरते.

शस्त्रक्रिया – मोठया आतडयाचा खराब झालेला भाग काढून टाकणे, हीच सर्वात चांगली उपाययोजना. कर्करोगाच्या दोन्ही बाजूंचा 5-10 सेमी भाग काढून ते पुन्हा जोडले जाते. मोठया आतडयाच्या आजूबाजूचा भागही काढला जातो. जर आजूबाजूचे अवयव या कर्करोगाला अडकलेले असतील तर तेही शक्य असल्यास काढले जातात. सर्वसाधारणतः मोठया आतडयांच्या कर्करोगाचे उपाय केल्यानंतर रुग्ण जगण्याची शक्यता चांगली असल्यामुळे मोठया शस्त्रक्रिया केल्या जातात. जर यकृत/फुप्फुस हे ही कर्करोगामुळे ग्रस्त झाले असल्यास त्याचा भाग काढून रुग्णास वाचवता येते. अगदी पुढे गेलेल्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करता येत नाही.

हेही वाचा : मधुमेह, हृदय अन् डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ भाजी ठरतेय गुणकारी; आहारात करा समावेश

केमोथेरपी – (Chemotherapy) आज अनेक नवीन औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधे वापरुन कर्करोगाच्या गाठी कमी करता येतात. यामुळे मोठया गाठी काढणे सुकर होते. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर थोडासा आजार बरा करता येतो. ही औषधे जरी महाग असली तरी त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु कुठल्याही कर्करोगाच्या औषधांप्रमाणे याचेही शरीरावर अनावश्यक परिणाम होतात. त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक असते. गेल्या दशकात monoclonal antibodies म्हणजेच कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी औषधे आली आहेत त्यामुळे रुग्णाला फायदा तर होतोच परंतु शरीरातील इतर भागावर परिणाम होत नाही.