आजची आधुनिक जीवनशैली विविध आजारांना निमंत्रण देणारी आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग या आजारांची संख्या वाढत आहे. अनेक लोकांना विविध आजार असतात. त्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन आजार एकत्र असणं अधिक धोकादायक आहे. परंतु, या आजारांचे निदान वेळेत होणे, त्या आजारांवर औषधोपचार करणे आवश्यक आहे. परंतु, हे आजार कसे ओळखावे, आपला रक्तदाब कसा मोजावा, उच्च रक्तदाबावर आणि मधुमेहावर औषधोपचार कसे आणि कधी करावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात मधुमेह होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये रक्तदाब आणि मधुमेह हे आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. कधीकधी मधुमेह असणाऱ्या लोकांना रक्तदाबाचाही त्रास असू शकतो. हे दोन्ही त्रास एकत्र होणे अधिक धोकादायक असते. मॅक्स हेल्थकेअरमधील एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटिसचे अध्यक्ष डॉ. अंबरिश मिथल यांनी दि इंडियन एक्सप्रेससह संवाद साधला. तेव्हा त्यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे त्रास आणि त्याचे परिणाम याविषयी संवाद साधला.
हेही वाचा : मुलींना फक्त सरकारी नोकरी करणारा नवरा हवा? मुलींच्या अपेक्षा समाज का ठरवतो?
डॉ. अंबरिश मिथल यांनी यासंदर्भात एक अनुभव सांगितला ते म्हणाले की, त्यांच्याकडे एक मधुमेह झालेली रुग्ण आलेली. तिच्या रक्तातील साखर तुलनेने नियंत्रणात होती. तिचा HbA1c काउंट ६.८ टक्के होती. तिचे वजनही नियंत्रणात होते. परंतु, तिचा रक्तदाब १४५/९६ होता. त्यानंतरही तिचा रक्तदाब १४०/९० होते. एकदा तिचा रक्तदाब १६०/१०० देखील होता. याचाच अर्थ तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हा रक्तदाबाचा त्रास मधुमेहाशी निगडित आहे. उच्च रक्तदाबामुळे इन्सुलिन स्रवण्यावर परिणाम होतो. या आजारांसाठी तिला योग्य औषधोपचारांची गरज होती.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह
हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक आवश्यक असते. कारण रक्तदाब अनियंत्रित झाल्यास मेंदूतील रक्तवाहिन्या फुटू शकतात, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच डोकेदुखी, चीडचीड होऊ होऊ शकते. आयएनडीआयएबी च्या अहवालानुसार, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ७० टक्के असते.
अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार एकत्रित असतील तर त्याचा हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर अधिक परिणाम होतो. अनेक वेळा रक्तदाबाचा त्रास अवयव निकामी होईपर्यंत किंवा शारीरिक त्रास होईपर्यंत लोकांना कळत नाही.
रक्तदाब कसा आणि कधी मोजावा ?
डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर्स या यंत्राद्वारे बीपी (रक्तदाब) मोजतात. बीपी तपासण्यापूर्वी ३० मिनिटे आधी चहा/कॉफी/कॅफिनयुक्त पेये/स्मोक्ड किंवा व्यायाम केलेला असता नये. बीपी मोजायच्या आधी ५ मिनिटे पाय जमिनीवर ठेवून शांत बसा. बीपी मोजताना बोलणे किंवा कृती टाळा. १ मिनिटाच्या अंतराने दोनदा रिडींग घ्या. त्याची सरासरी काढा. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचे निदान झाले असल्यास आठवड्यातून किमान दोनदा रक्तदाब तपासा. शारीरिक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. एम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग (एबीपीएम) प्रणालीमध्ये दर २० मिनिटांनी २४ तासांसाठी बीपी मोजले जाते.
औषधोपचार कधी सुरू करावा ?
जर बीपी १२०/८० असेल तर ते नॉर्मल समजण्यात येते. पण १५०/९५ असेल किंवा त्याहून अधिक असेल तर शरीरातील अवयव प्रभावित होण्याची शक्यता असते. यासाठी योग्य औषधोपचार आणि निरोगी जीवनशैली असणे आवश्यक आहे. कधीकधी औषधांचे दुष्परिणाम (साईडइफेक्ट्स) दिसतात. खोकला होणे, पायांना सूज येणे असे परिणाम दिसतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य डोस घेणे आवश्यक आहे.
रक्तदाब आणि मधुमेह हे आजार एकत्रितरित्या झाले असतील, तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे.