हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हिवाळ्यातील धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात आणखी एक समस्या उद्भवते ती म्हणजे अंगदुखी. हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास का होतो जाणून घ्या.

हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होण्यामागची कारणं

थंड हवामान
हिवाळ्यातील थंड हवामानामुळे स्नायुंवर ताण पडण्याची शक्यता असते. जेव्हा वातावरणात थंडी असते, तेव्हा रक्तवाहिन्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी संकुचित होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होऊन सांधे दुखू शकतात.

सुर्यप्रकाशाची कमतरता

सुर्यप्रकाश ‘विटामिन डी’चे नैसर्गिक स्रोतआहे. हिवाळ्यात सुर्यप्रकाशाची कमतरता असते, त्यामुळे शरीरात ‘विटामिन डी’ची कमतरता निर्माण झाल्याने हाडे आणि स्नायू दुखू शकतात.

हॉर्मोनल बदल
शरीरात हॉर्मोनल बदल झाल्यास हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास वाढू शकतो. विशेषतः महिलांना हा त्रास जास्त होऊ शकतो.

हवेतील आद्रता कमी होणे
हिवाळ्यात हवेतील आद्रता कमी झाल्यानेही अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरीराची हालचाल न करणे
हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अनेक आजरांना आमंत्रण मिळते, ते टाळण्यासाठी अनेकजण बाहेर जाणे टाळतात. पण सतत एका ठिकाणी बसून राहिल्याने, शरीराची हालचाल न केल्याने अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडता येत नसल्यास घरातच पुरेसा व्यायाम, शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे.