चहा हे अनेकांचे आवडते पेय आहे. गरम गरम वाफाळता चहा प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. बऱ्याच लोकांना गरम चहा पीत जेवण्याची सवय असते. काळा चहा, दूध व मसाला घातलेला चहा दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण उरकण्याचा एक उत्तम मार्ग आहे, असे अनेकांना वाटते. पण, या सवयीचे फायद्यांपेक्षा तोटेच जास्त आहेत.
काही आरोग्य तज्ज्ञ जेवणानंतर लगेच चहा पिण्याबाबत सावधगिरीचा इशारा देतात, विशेषतः जेव्हा पोषक घटकयुक्त आहाराचे सेवन केले जाते तेव्हा. चहामधील काही संयुगे पचनक्रियेत अडथळा आणू शकतात किंवा प्रमुख खनिजांचे शोषण कसे रोखू शकतात याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
जेवणानंतर लगेच चहा पिण्याआधी एकदा विचार केला पाहिजे? (So, should you rethink that post-meal sip?)
Tone 30 Pilates येथे सीनियर न्यूट्रिशनिस्ट असलेल्या आश्लेषा जोशी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “हो, जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने काही पोषक घटकांचे, विशेषतः लोहाचे शोषण होण्यास अडथळा येऊ शकतो हे खरे आहे. चहामध्ये टॅनिन व पॉलीफेनॉल ही संयुगे असतात, जी वनस्पती-आधारित अन्नामध्ये आढळणाऱ्या नॉन-हेम लोहाशी (non-heme iron) बांधली जाऊ शकतात. जेव्हा हे बंधन तयार होते तेव्हा ते जेवणातून तुमच्या शरीराकडून घेतल्या जाणाऱ्या लोहाचे प्रमाण कमी करते.”
हे विशेषतः अशा व्यक्तींसाठी उपयुक्त आहे, ज्यांच्या शरीरात आधीच लोहाचे प्रमाण कमी आहे किंवा ज्यांना लोहाच्या कमतरतेचा धोका जास्त आहे, जसे की, गर्भवती महिला, किशोरवयीन मुले किंवा शाकाहारी आहार घेणारे लोकांना जास्त धोका असतो. कालंतराने जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय जर कायम राहिली आणि आहारात लोहतत्त्व (iron) भरपूर असलेले किंवा लोहतत्त्व शोषणास मदत करणारे घटक नसतील, तर शरीरातील लोहतत्त्वाचा साठा कमी होऊ शकतो.
काही विशिष्ट प्रकारच्या चहामुळे पचनक्रिया किंवा शोषणावर परिणाम होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते का?(
Are certain types of tea that are more likely to affect digestion or absorption compared to others?)
वेगवेगळ्या प्रकारच्या चहामध्ये टॅनिन आणि इतर जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. जोशी सांगतात, “ब्लॅक टी आणि ग्रीन टीममध्ये लक्षणीय प्रमाणात टॅनिन असते, जे लोहाचे शोषण कमी करू शकते. मसाला चहामध्ये दालचिनी, आले व लवंग यांसारखे गरम मसाल्याचे पदार्थ असतात. त्याद्वारे काळा चहा तयार केला जातो. तरीही त्यामुळे लोहाच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो. परंतु, गरम मसाल्याचे काही पदार्थ पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरू शकतात, जे या परिणामाला अंशतः विरोध करतात.
“कॅमोमाइल किंवा पेपरमिंट यांसारख्या हर्बल टीमध्ये सामान्यतः टॅनिनचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे पोषक घटकांच्या शोषणात अडथळा येण्याची शक्यता कमी असते. पण, पचनावर होणारा त्यांचा परिणाम वैयक्तिक सहनशीलता (individual tolerance) आणि वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधी वनस्पतींवर अवलंबून बदलू शकतो,” असे जोशी स्पष्ट करतात.
जेवणानंतर चहा पिण्यापूर्वी किती वेळ वाट पाहावी आणि काही विशिष्ट आरोग्यविषयक परिस्थिती आहेत का ज्यामुळे हे अधिक महत्त्वाचे ठरते?(How long should one wait after a meal before having tea, and are there any specific health conditions that make this more important?)
जोशी नमूद करतात, “जेवणानंतर चहा पिण्यापूर्वी किमान ३० ते ६० मिनिटे वाट पाहणे” हे सर्वोत्तम आहे. या कालावधीत शरीराला पोषक घटक शोषण्यास सुरुवात होते आणि नंतर चहामधील टॅनिन आणि इतर संयुगे व्यत्यय आणू शकतात.
“अॅनिमिया, लोहाचे प्रमाण कमी असलेल्या व्यक्ती किंवा आजार किंवा शस्त्रक्रियेतून बऱ्या होणाऱ्या व्यक्तींसाठी ही वेळ आणखी महत्त्वाची ठरते. अॅसिड रिफ्लक्ससारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असलेल्या लोकांनाही जेवणानंतर लगेच चहा टाळावा लागू शकतो. कारण- त्यामुळे लक्षणे वाढू शकतात.
“जर एखाद्याला जेवणाबरोबर चहा जास्त आवडत असेल, तर ते हर्बल टी घेण्याचा विचार करू शकतात, जे शोषण रोखण्याची शक्यता कमी असते किंवा त्यांचे जेवण व्हिटॅमिन सी-समृद्ध अन्नाबरोबर सेवन करू शकतात, जे लोहाचे शोषण वाढवू शकते आणि टॅनिनचे काही परिणाम कमी करू शकते,” असा निष्कर्ष जोशी काढतात.