बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते. रोजचा कामाचा ताण, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, जेवणाच्या चुकीच्या सवयी, पुरेसा व्यायाम न करणे याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे महिला कुटुंबाच्या आरोग्याबद्दल अधिक काळजी घेत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण अशा परस्थितीत बऱ्याचदा महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते. रोज जाणवणाऱ्या काही समस्यांकडे महिला दुर्लक्ष करतात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या समस्या.

महिलांनी या समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळा

आणखी वाचा: हिवाळ्यात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे

वेगाने वजन कमी होणे
जर वजन वेगाने कमी होत असेल तर यामुळे महिला आनंदी होतात, पण हे काही गंभीर आजरांचे लक्षण असु शकते. वेगाने वजन कमी होणे टीबी, कॅन्सर, थायरॉईड अशा आजरांचे लक्षण असु शकते. तसेच हे पीसीओडीचे लक्षणही असु शकते, त्यामुळे वेगाने वजन कमी होत असल्यास महिलांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सतत थकवा जाणवणे
काही महिलांना पुरेशी झोप घेतली तरी सतत थकवा जाणवतो, हे हृदय, किडणी यांच्याशी संबंधित आजरांचे किंवा फर्टीलिटी संबंधित समस्यांचे लक्षण असु शकते.

अति केसगळती होणे
दिवसभरात ५० ते १०० केस गळणे सामान्य गोष्ट आहे, पण त्याहून अधिक अति केसगळती होणे ऑटो इम्युन सिस्टीम डिसॉर्डर किंवा थायरॉईडचे लक्षण असू शकते.

आणखी वाचा: नाश्ता टाळल्यास काय होते? जाणून घ्या याचे आरोग्यावर होणारे परिणाम

पोटात गॅस होणे
मासिक पाळी येण्याअगोदर महिलांना गॅसची समस्या जाणवते. पण जर याचा त्रास सतत होत असेल आणि यासह जास्त वेदना आणि रक्तस्त्राव होत असेल तर हे एंडोमेट्रिओसिस चे लक्षण असु शकते. यामुळे ओव्हेरिअन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासिक पाळी अनियमित होते
मासिक पाळी अनियमित होणे यूटेरिन फाइब्रोआइड, पॉलिसिस्टिक ओवरियन सिंड्रॉम, थायरॉईड या आजरांचे लक्षण असु शकते.