भारतीय जेवणाच्या ताटात हमखास दिसणारा पदार्थ म्हणजे चपाती किंवा पोळी. भात, भाजी, डाळ हे पदार्थ तर असतातच पण अनेकांना चपातीही हवी असते. अनेकजण भात-डाळीऐवजी भाजी चपाती खाणे पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, प्रत्येक पदार्थ खाण्याची एक योग्य वेळ असते,
यात अनेकांना जर विचारले की, तुम्ही चपाती दिवसातून किती वेळा खाता, तर सहसा दोन वेळा असे उत्तर येईल.

पण चपाती खाण्याचीही एक विशिष्ट वेळ असते. त्यावेळेतच चपाती खाणे शरीरास फायदेशीर ठरते. चपातीमध्ये भरपूर कॅलरीज आणि कार्ब्स असतात.
यामुळे रात्रीच्या वेळी चपाती खाल्ल्याने ती पचायला खूप वेळ लागतो. यासोबतच रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. म्हणजे रात्रीच्या जेवणात चपाती खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही.

रात्री चपाती खाणे फायदेशीर आहे की नाही?

गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीमध्ये ७१ कॅलरीज असतात. जर तुम्ही रात्री २ चपात्या खाल्ल्या तर तुमच्या शरीराला त्यातून १४२ कॅलरीज मिळतात. रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढण्याचा धोकाही वाढू शकतो.

Body Detox Symptoms : ‘ही’ ६ लक्षणे दिसल्यास समजून जा शरीरास पाण्याची किंवा हर्बल ड्रिंक्सची गरज आहे

एका दिवसात किती चपात्या खाव्यात?

जर तुम्ही चपाती खात असाल तर संध्याकाळी लवकर जेवावे. यावेळी २ पेक्षा जास्त खाऊ नका. जेवणात चपाती खाल्ल्यानंतर थोडावेळ चाला. रात्रीचे जेवण लवकर करा जेणेकरून जेवण पचायला योग्य वेळ मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही १ चपाती भाजी आणि सलाड आणि आमटी खाऊ शकता,

गॅसवर चपाती भाजल्याने होणारे तोटे

वेळ वाचवण्यासाठी बहुतेक लोक थेट गॅसवर चपाती भाजतात. पण असे करणे हानिकारक ठरू शकते. गॅसमध्ये चपाती शेकवल्याने त्याच्या आत भरलेली हवा आरोग्यास हानी पोहोचवू शकते. म्हणूनच चपाती तव्यावरचं शेकणे योग्य ठरेल,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(अधिक तपशिलांसाठी नेहमी एखाद्या तज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोकसत्ता या माहितीची जबाबदारी घेत नाही.)