Mental Health: आयुष्यात चढ उतार येत असतात. कधी चांगला काळ असतो कधी वाईट काळ असते. अशा स्थितीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात. सकारात्मक विचार तुम्हाला प्रेरणा देतात पण नकारात्मक विचार त्रासदायक ठरू शकतात. मनात विविध प्रकारच्या विचार येत असतात ज्यामुळे नैराश्याची भावना वाढते. तुमच्या मनातही असे नकारात्मक विचार येत असतील तर मन शांत करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या….
नकारात्मक विचारांना कसे दूर ठेवावे
व्यायाम करा
जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात तेव्हा तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करणे चांगले आहे. व्यायाम केल्याने शरीरातून असे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. त्यामुळे मनातील नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होईल.
विविध गोष्टींमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवा
मनाला नकारात्मक विचारांपासून दुसरीकडे वळवण्यासाठी व्यस्त राहणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुमच्या आवडत्या गोष्टी करा. मित्राला भेटायला जा. तुम्ही तुमचा कोणताही छंद जसे की, चित्रकला किंवा गाणे असे छंद जोपासू शकता.
डायरी लिहा
जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर डायरी लिहिणे उपयुक्त ठरू शकते. समस्येचे कारण लिहून ठेवल्याने मन हलके होते. अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाऊ शकते.
ध्यान
नकारात्मक विचारांमुळे मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचते. अशा परिस्थितीत, ध्यान मदत करू शकते. ध्यानासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. सकाळी लवकर उठून एकांतात ध्यान केल्याने मनात सकारात्मक विचार येतात. यामुळे तणावातूनही आराम मिळतो.
बाकी असलेले काम पूर्ण करा
मन विचलित होऊ नये म्हणून उरलेले काम पूर्ण करायला सुरुवात करा. त्यामुळे कामही पूर्ण होईल आणि व्यस्ततेमुळे मनात येणारे नकारात्मक विचारही दूर होतील.
हेही वाचा – टायरवर चढवले टायर, जुगाड करून तयार केली चारचाकी बाइक; Viral Video पाहून लोकांनी उडवली खिल्ली
खेळा आणि झोपा
कोणत्याही खेळात पूर्ण शरीर आणि मन गुंतते लागते. खेळताना मन खेळात पूर्णपणे गुंतून जाते आणि नकारात्मक विचार मनातून निघून जातात. मन शांत करण्यासाठी झोप हा देखील एक चांगला पर्याय आहे. चांगली आणि पुरेशी झोप तुम्हाला ताजेतवाने करेल.
पुस्तके
वाचन हा मोठा छंद मानला जातो. चांगली पुस्तके वाचल्याने नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तुमचे मन शांत करण्यासाठी प्रेरणादायी पुस्तके वाचा. आपण सकारात्मक विचार आणि प्रसिद्ध लोकांचे सुविचार वाचून नकारात्मकता देखील दूर करू शकता.