How To Check Egg Boiled Or Not: अंडी खायला अनेकांना आवडतात. विशेषतः उकडलेली अंडी बहुतेकांना सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये खाण्याची सवय असते. अंडी हा प्रोटीनचा मुख्य स्त्रोत आहे जो आपले स्नायू आणि शरीर मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, फोलेट, व्हिटॅमिन बी२ , व्हिटॅमिन बी५, व्हिटॅमिन बी१२, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक देखील आढळतात, जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक असतात.

अंडी अनेक प्रकारे खाता येतात..

अंडी आपण अनेक प्रकारे खाऊ शकतो. अनेकांना अंड्याचे ऑम्लेट बनवून खायला आवडते, तर काहींना भुर्जी, तसेच अंडी करी, ब्रेड टोस्ट किंवा हाफ फ्राय बनवून खायला आवडते. पण बहुतेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते अंडे खाण्याचा सर्वात पौष्टिक मार्ग म्हणजे उकडलेले अंडे खाणे. कारण उकडलेल्या अंड्यामध्ये कोणत्याही तेलाचा वापर केला जात नाही.

अंडे उकडणे सोपे की कठीण?

अंडी उकडणे सोपे आहे तसेच ते कठीणही आहे, आम्ही हे यासाठी म्हणत आहोत की, अंडी उकडण्यासाठी फक्त गॅस, पॅन आणि थोडे पाणी आवश्यक असते, परंतु या कामात कठीण गोष्ट म्हणजे अंडी नीट उकडली आहेत की नाहीत हे आपल्याला समजत नाही. अंडी खाण्यासाठी जेव्हा आपण अंड्याचे कवच सोलतो तेव्हा कळते की अंडे आतून अर्धे कच्चे आहे. त्यामुळे अंडी उकडली की नाहीत पटकन समजत नाही. चला तर मग जाणून घेऊया की अंडे पूर्णपणे उकडलेले आहे की कच्चे आहे हे कसे समजेल..

( हे ही वाचा: ‘अंड्यातील पिवळ बलक’ की ‘अंड्याचा पांढरा भाग’: कोणता भाग आरोग्यासाठी फायदेशीर आहे?)

अंडी उकडली की नाहीत ते कसे समजेल?

पहिली पद्धत

अंड्याला एका सपाट पृष्ठभागावर फिरवा आणि आपल्या बोटाने अचानक थांबवण्याचा प्रयत्न करा. जर ते स्थिर राहिले तर ते पूर्णपणे उकडलेले आहे. जर ते फिरवताना डगमगले तर समजून जा की ते आतून कच्चे आहे.

दुसरा मार्ग

जर अंडी पूर्णपणे उकडली असतील तर भांड्यामध्ये त्याच्या पृष्ठभागावरुन पांढरे रंगाचे फुगे बाहेर येऊ लागतात. साधारणपणे, अंडी १० ते १५ मिनिटांत खाण्यायोग्य बनतात. आपण ते भांड्यामधून काढू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरा मार्ग

भांड्यातून अंडी काढा आणि कानाजवळ थोडं हलवण्याचा प्रयत्न करा. जर त्यातून काही वाजण्याचा आवाज येत असेल तर समजून घ्या की अंडे आतून शिजायचे आहे. त्यामुळे काही मिनिटे पुन्हा पाण्यात अंडी टाकून काही मिनिटे उकळवा.