How to get rid of sweat stains: उन्हाळ्यामध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण पांढरे कपडे घ्यालण्यास प्राधान्य देतात कारण त्यामुळे शरीरासाठी आरामदायी असते. पण हे कपडे स्वच्छ करणे फार अवघड काम आहे. खरं तर उन्हाळ्यामध्ये शरीरातून खूप घाम येतो आणि त्याचे डाग कपड्यांवर राहतात. कोणत्याही कपड्यावर घामाचे डाग हटवणे सोपे काम नसते. घामाचे डाग असलेला भाग ब्रशने घासला तर कपडे फाटण्याची शक्यता असते अशामध्ये थोडा विचार करून आणि सावधगिरी बाळगून कपडे स्वच्छ करावे लागतात. चला तर मग पांढरे कपड्यांना लागलेले घामाचे डाग सहज हटविण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ या.

कसे हटवावे पांढऱ्या कपड्यावरील घामाचे डाग (How to Remove Sweat Stains)

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How To Make Home Made Raw Banana Fry Or Maharastrian Style Kachya Kelyache Kaap Note Recipe
१० मिनिटांत करा ‘कच्च्या केळ्यांचे तिखट काप’; ‘ही’ चटपटीत रेसिपी लगेच नोट करा…
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

लिंबू वापरा

उन्हाळ्यामध्ये घामाचे डाग पडवणाऱ्या किंमती साफ करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे लिंबाचा रस. त्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि घामचे डाग लागलेल्या जागी लावा. थोड्यावेळाने ते धूवून टाका. तुम्ही पाहू शकता ही सर्व डाग काही मिनिटांमध्ये गायब झाले आहेत.

बेकिंग सोडा ठरेल फायदेशीर

पांढऱ्या कपड्यांवरील डाग हटविण्यासाठी बेकिंग सोडा देखील खूप फायदेशीर ठरू शकतो, त्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि कपड्यावर डाग असलेल्या जागी लावा. थोडावेळ हातावर घेऊन घासल्यानंतर धूवून टाका. सर्व हट्टी डाग स्वच्छ होऊन जातील.

हेही वाचा – नाश्त्यामध्ये आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कसे करू शकता सेवन…

पांढरे व्हिनेगर वापरा

घामाचे डाग हटविण्यासाठी तुम्ही पांढरे व्हिनेगर वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला पाणी थोडं कोमट गरम करावं लागेल त्यामध्ये एक झाकन पाढरे व्हिनेगर टाका. त्यासाठी पाण्याणध्ये काही वेळ कपडे भिजवून सर्व डाग काढून टाका.

लिक्विड डिटर्जेंट वापरा

जर कपड्याला लागलेले डाग अगदी ताजे असतील तर त्वरीत गरम पाण्यात भिजवा. त्यानंतर कपडे पाण्यातून काढा आणि त्यामध्ये लिक्विड डिटर्जेंट लावून १० मिनिट तसेच सोडून द्या. मग डाग असलेला भाग ब्रशन घासून पाण्याने धूवून टाका.

हेही वाचा – ट्रॉली बॅग काळी पडली आहे का? मग हे ५ सोपे उपाय वापरून करा साफ, काही मिनिटांमध्ये होईल स्वच्छ

सोड्याचे पाणी ठरेल फायदेशीर

पांढऱ्या सोड्याचे पाण्यामध्ये १० मिनिटं कपडे भिजवा. असे केल्याने हट्टी डाग निघून जातील आणि त्यासोबतच घामाचा वास देखील निघून जाईल. कपड्यांचा चांगला वास येईल.

तसे उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि घामाचे डाग पडणे सामान्य गोष्ट आहे पण त्यापासून झटपट सुटका मिळविण्यासाठी काही सोप्या उपाय वापरू शकता.