बर्गर, पिझ्झा सारख्या या पदार्थांचे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. कधीकधी असे घडते की बाहेरचे हे पदार्थ खाण्यापूर्वी आपण शंभर वेळा विचार करतो. जर तुम्ही बाहेरच्या ऐवजी घरी काही फास्ट फूड बनवण्याचा विचार करत असाल तर बर्गर नक्की ट्राय करा. बर्गर बनवणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला जर संध्याकाळचा नाश्ता हा मस्त टेस्टी हवा असेल आणि झटपट नाश्ता बनवायचा असेल तर असा नाश्ता बनवण्यासाठी आलू टिक्की बर्गर हा एक उत्तम पर्याय तुमच्याकडे असू शकतो. तुम्ही जर बर्गर घरी बनवत असाल तर तुम्ही तयार केलेला बर्गर हा कुरकुरीत तसेच बर्गरचा बन हा जास्तच सॉफ्ट होत नाही ना याची खात्री करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. यासाठी ‘शेफ कुणाल कुमार’ यांनी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत. ज्याने रेस्टॉरंट स्टाईल आलू टिक्की बर्गर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. चला तर जाणून घेऊयात क्रिस्पी आलू टिक्की बर्गर बनवण्यासाठीच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– आलू टिक्की बर्गर बनवताना बर्गरमध्ये आलू टिक्की ठेवण्याआधी त्या बनवर लेट्यूसचा (lettuce) एक पान ठेवा. याने तुम्ही बर्गर बनवताना टिक्की वर लावण्यात येणार्‍या सॉसमुळे बर्गर हा अधिकच सॉफ्ट होत नाही. तसेच यामधील आलू टिक्कीचा स्वाद टिकून राहतो आणि कुरकुरीत देखील राहते.

– तुम्हाला जर बर्गरमधली आलू टिक्की अधिक कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही त्या टिक्कीला स्लरी आणि ब्रेड क्रंबसह कोट करा. असे दोनदा करून तुम्ही ही टिक्की कुरकुरीत तळून घ्या.

– तुम्ही तयार केलेली आलू टिक्की ही एकदा ब्रेड क्रंबमध्ये दोन ते तीन वेळा कोट केली की ही टिक्की तुम्ही चार ते सहा आठवड्यांसाठी डीप फ्रीजर करू शकता. यानंतर तुम्हाला कधी बर्गर खाण्याची इच्छा किंवा झटपट नाश्ता करायचा झाला की तुम्ही डीप फ्रीजर मधून आलू टिक्की काढून ती डिप फ्राय करा.

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल बर्गर बनवून खाण्याचा आनंद घेऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make instant crispy potato tiki burger learn simple tips and tricks scsm
First published on: 11-08-2021 at 14:12 IST