scorecardresearch

Jaggery Purity : तुम्ही विकत घेतलाय तो गुळ केमिकलयुक्त आहे का? घरच्या घरी ओळखा ‘खऱ्या’ व ‘खोट्या’ गुळामधला फरक

दिवाळीत अनारसे, करंज्या तसंच सारणपुडीसाठी तुम्ही बाजारातून आणलेला गुळ हा शुद्ध असेलच याची खात्री आहे का? नाही तर यावरून ओळखा शुद्ध गुळ आणि भेसळयुक्त गुळामधला फरक…

Chemical-free-Jaggery

दिवाळीच्या सणासाठी बाजारात गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवाळीत गृहिणी अनारसे, करंज्या तसंच सारणपुडीसाठी गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. दिवाळीत फराळ बनवण्यासाठी गृहिणी सध्या बाजारात गुळ खरेदी करताना दिसून येत आहेत. सध्या बाजारात गुळाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही बाजारातून खरेदी केलेला गुळ पूर्णपणे शुद्ध असल्याची खात्री तुम्ही कशी करू शकता? सध्या अनेक दुकानदार पैसे कमवण्यासाठी बनावट गुळ बनवून विकत असतात. असा गुळ तुमच्या आरोग्यास हानिकारक आहे. म्हणून तुम्ही बाजारातून आणलेला गुळ हा खरा आहे की खोटा, हे तपासून घेणं गरजेचं बनलं आहे. पण नक्की हे कसं ओळखावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. खरा गुळ आणि केमिलकलयुक्त गुळ ओळखण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा ओळखू शकता. चला तर जाणून घेऊया चांगल्या दर्जाचा गूळ कसा ओळखावा?

हिवाळ्यात मिळणारा गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. गुळाचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे थंड वातावरणात गुळाचे सेवन केल्यास शरीर उबदार राहते. गुळामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात, त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, जस्त, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी, तसेच २०% इनवर्टेड शुगर आणि 50% सुक्रोजचे प्रमाण जास्त असतं.

गूळ हे आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. तरी आजच्या काळात लोक अधिक नफा मिळवण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्यापासून मागे हटत नाहीत. केवळ शुद्ध गूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे, भेसळयुक्त गुळाचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट भेसळयुक्त गुळात मिसळलेले असतात. अशा स्थितीत गूळ खरेदी करण्यापूर्वी तपासा की तो खरा आहे की भेसळयुक्त?

घरच्या घरी शुद्ध गुळ ओळखण्याची पद्धत :

रंग: शुद्ध गूळ तपकिरी रंगाचा असतो. अशा परिस्थितीत तपकिरी रंगाचा गूळच खरेदी करा, पिवळा आणि हलका तपकिरी रंगाचा गूळ भेसळयुक्त असल्याने खरेदी करणे टाळा. गूळ तयार करण्यासाठी, उसाचा रस उकळला जातो. जोपर्यंत त्यात असलेले सर्व विष काढून टाकले जात नाही तोपर्यंत उसाचा रस उकळता जातो. उकळण्यामुळे होणाऱ्या रासायनिक क्रियांमुळे गुळाचा रंग गडद लाल किंवा तपकिरी होतो. नंतर, त्यात नैसर्गिक गोष्टी घालून रंग दुरुस्त केला जातो.

शुद्ध गूळ पाण्यात विरघळतो: गूळ खरा आहे की नकली हे तपासायचे असेल, तर एका भांड्यात पाणी भरून त्यात गूळ टाका, जर गुळात भेसळ असेल तर तो स्थिर होईल, तर शुद्ध गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळेल.

कडक गूळ: शुद्ध गुळ किती कडक आहे हे देखील ओळखता येतं. गूळ जितका कडक तितकाच त्याच्या शुद्धतेची हमी जास्त असते. अशा स्थितीत बाजारातून गूळ घेण्याआधी पहा, तो कडक आहे की नाही?

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 21:06 IST

संबंधित बातम्या