scorecardresearch

किडनी स्टोन असल्यास ‘या’ गोष्टी नक्की खा; लवकरच समस्येपासून सुटका मिळेल

Kidney Stone Diet: किडनी स्टोन रोखण्यात आणि नियंत्रित करण्यात आहाराचा मोठा वाटा आहे. काही गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही त्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.

किडनी स्टोन असल्यास ‘या’ गोष्टी नक्की खा; लवकरच समस्येपासून सुटका मिळेल
किडनी स्टोन असल्यास 'या' गोष्टी नक्की खा(फोटो: jansatta)

Kidney Stone Diet: किडनी स्टोन खूप वेदनादायक असतात. किडनी स्टोन असल्यास होणारा त्रास असहनीय असतो. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर शस्त्रक्रिया शिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की चांगल्या आहाराद्वारे आपण त्यांना बर्‍याच प्रमाणात व्यवस्थापित करू शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, यावर वेळीच थोडे लक्ष दिले तर ऑपरेशनची देखील आवश्यकता नसते. त्यामुळे किडनी स्टोन असल्यास, विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शरीरात अनेक कारणांमुळे किडनी स्टोन तयार होतात. जेव्हा मूत्रातील कॅल्शियम ऑक्सलेट किंवा फॉस्फरस सारख्या रसायनांना भेटते. तेव्हा या गोष्टी एकत्र येऊन किडनी स्टोन बनतात. युरिक अॅसिड साचल्यामुळेही खडे तयार होतात. त्यांना टाळण्यासाठी किंवा प्रतिबंध घालण्यासाठी आपल्याला आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीचा आहार कसा असावा जाणून घ्या.

भरपूर पाणी प्या

शरीरातील कोणतेही रसायन पातळ करण्यासाठी पाणी हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. जर तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका. किडनी स्टोन असल्यास, जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील असणारे स्टोन विरघळण्यास मदत होते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

( हे ही वाचा: Breast Cancer: ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतील! नवीन संशोधनातून समोर आली माहिती)

व्हिटॅमिन डी घ्या

जर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी असेल तर ऑक्सलेटची पातळी वाढू शकते. किडनी स्टोन टाळण्यासाठी कॅल्शियम असलेले अन्न खा. यावेळी सप्लिमेंट घेणं सहसा टाळा. दूध, दही आणि चीजमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे यांचा आहारात समावेश करा. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू देऊ नका. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहे.

लिंबूपाणी प्या

सिट्रस पदार्थ एकंदर आरोग्यासाठी चांगले असतात. लिंबू, संत्री इत्यादींमध्ये सिट्रस असते, जे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे सिट्रसवाल्या फळांचा आहारात नक्की समावेश करा. त्याचप्रमाणे भरपूर लिंबूपाणी प्या.

( हे ही वाचा: Heart Disease: निरोगी राहण्यासाठी हृदयरोग्यांनी ‘या’ गोष्टी नाश्त्यात खाव्यात; मिळेल भरपूर फायदा)

हे पदार्थ टाळा

पालक, फ्लॉवर, चॉकलेट, रताळे हे उच्च ऑक्सलेट असलेले पदार्थ आहेत. जर तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर ते खाऊ नका. हळदीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी जेवणात हळदीचा वापर करणे टाळावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you have kidney stones definitely eat these things the problem will be solved soon gps