धुळीची एलर्जी ही अनेकांना होत असते. ज्यामुळे त्यांना शिंका येणे, श्वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, भरलेले नाक, डोळे सुजणे, डोळे-नाक आणि घशात खाज येणे, खोकला, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. यासह हवेमध्ये परागकणांचे कण, प्राण्यांचे केस आणि कोवळे, बुरशी आणि अनेक प्रकारचे जीवाणू हे देखील एलर्जी निर्माण करतात. चला तर मग जाणून घेऊयात घरगुती उपाय अवलंबून धुळीची एलर्जी दूर करण्यास कशी मदत होते.

सफरचंद व्हिनेगर

धुळीच्या एलर्जी पासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर टाकून घ्या. तसेच या पाण्यात तुम्ही चवीसाठी दोन चमचे मध टाकून घेऊन शकतात. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

नीलगिरी तेल

एलर्जीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही निलगिरी तेल वापरू शकता. यासाठी निलगिरी तेलाचे ४ ते ५ थेंब गरम पाण्यात टाका आणि वाफ घ्या.किंवा तुम्ही वाफेच्या मशिनीद्वारे वाफ घेऊ शकता. दरम्यान या तेलांमध्ये दाहक-विरोधी आणि वेदनशामक गुणधर्म आहेत. जे दाह आणि वेदना दूर करण्यास मदत करतात.

मध

तुम्हाला जर वारंवार धुळीचा त्रास होत असेल तर तुम्ही मधाचे सेवन करत रहावे. कारण एलर्जी दूर करण्यासाठी मध मदत करते. याकरिता तुम्ही दररोज दोन चमचे मधाचे सेवन करा. मधाच सेवन तुम्ही एक कप कोमट पाण्यात मिक्स करून देखील करू शकता. तसेच मधामध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म देखील असतात. जे एलर्जीपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरते.

हळद

धुळीची एलर्जी झाल्यास तुम्ही हळद आणि काळी मिरीचा वापर करू शकतात. तुम्हाला एलर्जीपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही एक कप दुधात एक चमचा हळद मिक्स करा. हे दूध एका भांड्यात उकळवा व यानंतर हे दूध थंड करा. थंड झाल्यावर वर या दुधात एक चिमूटभर काळी मिरी मिक्स करा. त्यासोबत थोडे मध देखील मिक्स करा. यानंतर या दुधाचे सेवन करून घ्या. हळदी मध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.

कोरफडीचे ज्यूस

धुळीच्या एलर्जीला दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या ज्यूसचा देखील सेवन करू शकता. तुम्ही एक कोरफडीची फोड घेऊन आतील गर काढा. त्यानंतर काढलेल्या गरमध्ये तुम्ही एक कप पाणी टाकून मिक्सर मध्ये फिरवून त्याचा ज्यूस तयार करा. यानंतर कोरफडीच्या ज्यूसचे सेवन करा. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, तसेच जीवाणू आणि फंगस नष्ट करणारे गुणधर्म आहेत. जे एलर्जीमुळे होणाऱ्या सर्व समस्या कमी करण्यास मदत करतात.

(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)