युरिक ॲसिड हे शरीरात तयार होणारे एकप्रकारचे टॉक्सिन आहे जे आपल्या सर्वांच्या शरीरात तयार होते. जेव्हा शरीरात यूरिक ॲसिड तयार होते त्यावेळी किडनी ते फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. परंतु जेव्हा किडनी हे खराब युरिक ॲसिड शरीरातून काढून टाकू शकत नाही, तेव्हा ते सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या रूपात जमा होऊ लागते, ज्यामुळे हायपरयुरिसेमिया नावाची स्थिती उद्भवते. आहारात प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वेगाने वाढू लागते. जेव्हा युरिक ॲसिड वाढते तेव्हा सांधेदुखी आणि शरीरावर सूज येण्याची समस्या निर्माण होते.

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ बिमल झांजेर यांच्या मते, जर यूरिक ॲसिडवर वेळीच उपचार केले नाहीत तर ते हाडे, सांध्यांना नुकसान पोहोचवू शकतात. एवढेच नाही तर यूरिक ॲसिड जास्त असल्यास किडनी निकामी आणि हृदयविकाराचा धोकाही होऊ शकतो.

Uric Acid Removal Food
रक्तातील खराब युरिक अ‍ॅसिड झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ पाच पदार्थ; डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Surya Gochar 2024
२२ दिवस ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? सूर्यदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी

अलीकडेच बर्‍याच संशोधनांमध्ये हे उघड झाले आहे की उच्च यूरिक ॲसिडचा संबंध टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरशी आहे. काही फळांचे सेवन युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. तज्ज्ञांच्या मते, जर रक्तात यूरिक ॲसिड वाढले असेल तर हे पाच पदार्थ खाल्ल्याने ते मुळापासून दूर होऊ शकते. यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते पदार्थ वापरता येतात ते जाणून घेऊया.

ग्रीन टीचे सेवन करा

ज्या लोकांना यूरिक ॲसिडची समस्या आहे. त्यांनी ग्रीन टीचे सेवन करावे. ग्रीन टीचे सेवन केल्याने युरीक ॲसिडचे उच्च प्रमाण लघवीद्वारे सहज बाहेर फेकले जाते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असते, ज्यामुळे आरोग्याला खूप फायदा होतो.

आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा

आहारात फायबरयुक्त धान्य आणि भाज्यांचा समावेश करा. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन युरिकॲसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. फायबर युक्त आहारामध्ये ओट्स, संपूर्ण धान्य, भाज्या आणि ब्रोकोलीचे सेवन करा. हे सर्व फायबरयुक्त पदार्थ युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत.

आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करा

जर तुम्हाला युरिक ॲसिड नियंत्रित करायचं असेल तर व्हिटॅमिन सी घ्या. आहारात व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि युरिक ॲसिडही नियंत्रित होते. व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांमध्ये तुम्ही संत्री, लिंबूवर्गीय फळे आवळा खाऊ शकता.

( हे ही वाचा: मोमोज खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा Momos खावे)

चेरीचे सेवन करा

चेरीचे सेवन युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की चेरी यूरिक ॲसिड कमी करते कारण त्यात अँथोसायनिन्स असतात, जे चेरींना त्यांचा रंग देतात. ज्या लोकांना यूरिक ॲसिड जास्त आहे त्यांनी चेरीचे सेवन करावे.

जास्त पाणी प्या

तुम्हाक युरिक ॲसिडची समस्या असल्यास जास्त पाणी प्या. पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते आणि युरिक ॲसिड नियंत्रित राहते. युरिक ॲसिडचे रुग्ण जास्त पाणी सेवन करून युरिक ॲसिडवर सहज नियंत्रण ठेवू शकतात.