व्हॅलेंटाइन डे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. फेब्रुवारी महिना म्हटलं की अनेक तरुण-तरुणींना एकच गोष्ट खुणावत असते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डे आणि तो दिवस कसा साजरा करायचा याचं प्लॅनिंग अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे करत करतात. शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी छान गिफ्ट देऊन सरप्राइज देण्याचा विचार अनेकजण करतात. पण जसा जमाना बदलला तशी मुला-मुलींची आवडदेखील बदलली आहे.

त्यामुळे बदलत्या जमान्यातील तरुणाईला देण्यासाठीची आणि त्यांना इंम्प्रेस करणारी काही गिफ्ट देण्याच्या टिप्स आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला इंम्प्रेस करु शकाल. खरं तर बाजारात एकापेक्षा एक चांगले गिफ्ट्स उपलब्ध आहेत. पण त्याच्या किमती भरमसाट असतात. शिवाय आपण घेतलेल्या गिफ्ट्सचा वापरही आपल्या जोडीदाराला करता यावा आणि ती त्याच्या दैनंदिन कामात उपयोगाला यावीत याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

हेही वाचा- २०२३ Valentine पासून ‘या’ राशींना मिळणार अमाप प्रेम? १४ फेब्रुवारीनंतर पार्टनरमुळे उजळेल भाग्य

मुलांना देण्याच्या भेटवस्तू –

पुरुष हा महिलांसारखा सौंदर्यात अडकून न राहता वेगवगळ्या साहसी गोष्टी करण्यात रमतो असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियकराला जर काही शोभेची वस्तू दिली तर त्याला त्याचं आकर्षन वाटणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रियकराला काय भेट वस्तू दिली तर त्याला जास्त आवडेल ते जाणून घ्या.

ट्रॅक सूट –

तु्म्ही तुमच्या बॉयफ्रेंडला ट्रॅकसूट गिफ्ट म्हणून देऊ शकता. कारण मुलांना व्यायामापासून ते प्रवासापर्यंत आरामदायक कपडे घालायला आवडतात. त्यामुळे हे गिफ्ट त्यांच्या उपयोगात येईलच शिवाय तो ज्या ज्या वेळी तुम्ही दिलेलं ट्रॅक सूट घालेल तेव्हा नक्कीच तुमची आठवण काढेल यात शंका नाही. पण ट्रॅक सूटची निवड करताना प्रियकराचा आवडीचा रंग आणि कम्फर्ट लक्षात ठेवा.

पॉवर बँक –

हेही वाचा- ‘या’ ७ टिप्स बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवतील, परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या

मुलं अनेकदा नोकरीनिमित्त किंवा अभ्यासासाठी घराबाहेर राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही बॉयफ्रेंडला पॉवरबँक गिफ्ट करू शकता. या गिफ्टचा त्यांना पुरेपूर फायदा होईल.

घड्याळ –

मुलांना घडाळ्यांची खूप आवड असते. सध्या बाजारात अनेक विविध प्रकारची अनेक घड्याळ उपलब्ध आहेत. त्यामध्ये डिजीटल किंवा अनॅलॉग घड्याळ तुम्ही जोडीदाराला भेट देऊ शकता. जे त्यांना नक्की आवडेल.

ब्रेसलेट –

मुलांना हातात काहीना काही घालायला आवडत. त्यामुळे त्यांना सुंदर असं ब्रेसलेट गिफ्ट म्हणून देऊ शकता.

साईड बॅग –

मुलं नेहमी ट्रेकसाठी किंवा पिकनिकसाठी बाहेर जंगलात गडांवर जात असतात. पण विसरभोळ्या स्वभावामुळे अनेकदा ते काही वस्तू गमवतात किंवा घरात विसरून ट्रेकला जातात. त्यामुळे त्यांना साईडबॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता. जेणेकरून ते त्या बॅगमध्ये त्यांचा फोन, चार्जर, रुमाल, मास्क, व्हिजिटिंग कार्ड, असे महत्वाचं सामान ठेऊ शकतात.

मुलींना देण्याच्या भेटवस्तू –

मुलांना गिफ्ट काय घेऊन जायचं हे तर सांगितलं आता मुलांना त्यांच्या प्रेयसीसाठी कोणती गिफ्ट घेऊन जायला हवीत ज्यामुळे तुमचे चांगले इम्प्रेशन पडेल याबाबतची माहिती देणार आहोत. अनेक मुलींचा स्मार्टनेस खूप जबरदस्त असतो त्या तुम्ही काय गिफ्ट देता, यावरुन तुमच्या स्वभावाचा आणि वर्तवणुकीचा अंदाज लावू शकतात. त्यामुळे मुलींना आवडणाऱ्या आणि इम्प्रेस करणारे गिफ्ट द्यायचे तर काय? असा प्रश्न अनेक मुलांना पडतो. या तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज देणार आहोत. तसं मुलींना काय काय आवडत याची लिस्ट खूप मोठी होईल कारण त्यांना सजायला खूप आवडतं. पण त्यातही तुम्ही त्यांना इंम्प्रेस करण्यासाठी पुढील गिफ्ट देऊ शकता.

फुले किंवा फुलांचा पुष्पगुच्छ –

फुले मुलींना नेहमीच आवडतात. त्यांना केवळ महागड्या वस्तू दिल्यावरच त्या इम्प्रेस होतात हा काहींचा गैरसमज आहे. त्या तुम्ही दिलेल्या एखाद्या आकर्षक पुष्पगुच्छामुळेही इम्प्रेस होतात. त्यामुळे तुम्ही व्हॅलेंटाइन डे दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला गुलाबाचं किंवा इतर कोणतही आकर्षक दिसणारं फुलं घेऊ शकता. शिवाय वेगवेगळी फुले निवडून त्याचा पुष्पगुच्छ बनवून प्रेयसीला देऊ शकता.

चॉकलेट –

सेफ गिफ्टच्या यादीत चॉकलेटचे देखील नाव येते. मुलींना चॉकलेट्स खूप आवडतात, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी चॉकलेट बॉक्स घेऊन जाऊ शकता. मात्र, चॉकलेट्स खरेदी करताना चांगल्या दर्जाची घेऊन जा कारण चॉकलेट्सच्या चॉईसवरुन त्या तुम्हाला जज करु शकतात.

फॅशन ज्वेलरी –

हेही वाचा- लग्न-साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते? यामागील कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल

गिफ्ट असे असावे की ते थेट हृदयापर्यंत जाईल आणि प्रेयसीला भावेल तर ते गिफ्ट म्हणजे ज्वेलरी. मुलींना दागिने आवडणार नाही असं होऊच शकत नाही. प्रत्येकीला दागिन्यांची स्टाईल वेगळी वेगळी आवडत असली तरी दागिने सर्वांनाच आवडतात. दागिन्यांमध्ये फक्त सोने, चांदी किंवा डायमंडच नाही, तर आजकाल फॅशनच्या दागिन्यांचीही खूप क्रेझ आहे. ते दागिने परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. मोठमोठ्या डिझायनर्सनी डिझाइन केलेल्या दागिने तुमच्या प्रेयसीला इम्प्रेस करु शकत

बॅग किंवा पर्स –

कॉलेजला जाणाऱ्या मुली असो की ऑफीसला सर्वच मुली बॅग वापरतात. क्लासी आणि ट्रेंडी बॅग्ज तर प्रत्येक मुलीच्या अॅक्सेसरीजमधील एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणतीही बॅग घेण्याती दिवस आता संपले आहेत. उत्तम दर्जाची बॅग ही मुलींसाठी फॅशन बनली आहे. शिवाय अनेक प्रकारच्या आकर्षक बॅग बाजारात उपलब्ध आहेत. अनेक ब्रँडेड पर्स ही एक अशी गिफ्ट आहे जी मुलींना खूप आवडते.

परफ्यूम-

आधी सांगितल्याप्रमाणे मुलींना सजायला कार्यक्रमात मिरवायला खूप आवडत त्यामुळे त्यांना परफ्यूम वापरायला खूप आवडचं. परफ्यूम सामान्य वाटत असले तरी ते कधीही आउटडेटेड न होणारे गिफ्ट आहे. मुलींनाही परफ्यूम खूप आवडतात त्यामुळे तुम्ही ते देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता.

आवडीनुसार द्या गिफ्ट –

वरील गिफ्ट्सपैकी तुम्हाला काहीच पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार त्या संबंधित गिफ्ट देऊ शकता. ज्यामध्ये कोणाला गायणाची आवड असेल किंवा वाचनाची तर त्या कलेशी निगडीत गिफ्ट तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. अशा प्रकारच्या गिफ्ट देऊन तुम्ही तुमच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम या व्हॅलेंटाईन डे ला वाढवू शकता.