High Cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आजच्या काळात बहुतेक लोकांना आहे. याचे कारण अनेकदा अस्वास्थ्यकर जीवनशैली असू शकते. ज्यामध्ये जास्त चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि जास्त मद्यपान आहेत. ह्या सवयी सध्या तुम्हाला आरामदायी आणि मजेशीर वाटू शकतात, परंतु जीवनशैलीच्या या सवयी दीर्घकाळापर्यंत तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. NCBI च्या मते, अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील २५-३०% शहरी आणि १५-२०% ग्रामीण लोक उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा काय होते?

उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते. यासोबतच यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोकचाही धोका असतो.

उच्च कोलेस्टेरॉलचे संकेत

उच्च कोलेस्टेरॉलचे संकेत कधीकधी इतके सामान्य असतात की त्याचे निदान करण्यास विलंब होतो. आणि कालांतराने तुमच्या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या ब्लॉकेजमुळे शरीराला उर्वरित शरीराला रक्तपुरवठा करण्यावर अधिक जोर द्यावा लागतो. म्हणून, उच्च कोलेस्टेरॉलची चिन्हे वेळेवर ओळखणे महत्वाचे आहे. यामध्ये तुमच्या पायात दिसणारे काही बदल तुम्हाला मदत करू शकतात.

( हे ही वाचा: Diabetes and Rice: आता डायबिटीज रुग्ण देखील भात खाऊ शकतात! पण पांढरा भात खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा)

चालण्यास त्रास होणे हे कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे

शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे होणारे पेरिफेरल आर्टेरियल डिजीज तुमच्या पायांमध्ये दुखणे निर्माण करू शकतात, विशेषत: हे जेव्हा होते ज्यावेळी तुम्ही चालत असता. या वेदना सौम्य ते गंभीर असू शकतात आणि उभे राहताना आणि चालताना अचानक दुखण्यासारखे असू शकतात. काही मिनिटांनी विश्रांती घेतल्यानंतर हे सहसा निघून जाते. हृदयापासून पायांपर्यंत खराब रक्ताभिसरणामुळे, दोन्ही पाय एकाच वेळी प्रभावित होऊ शकतात, तर एका पायात वेदना जास्त असू शकतात.

पेरिफेरल आर्टेरियल डिजीजची इतर लक्षणे

  • पाय आणि पायांचे केस गळणे
  • पाय सुन्न किंवा अशक्तपणा
  • ठिसूळ आणि हळूहळू वाढणारी पायाची नखे
  • तुमच्या पायावरचे फोड जे बरे होत नाहीत
  • पायांचा फिकट किंवा निळसर रंग
  • पायांचे स्नायू आकुंचन

( हे ही वाचा: Weight Loss: शरीराला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत? जाणून घ्या संतुलित वजनासाठी आहाराची योग्य मात्रा)

घाणेरडे कोलेस्टेरॉल नसा खराब करते

कोलेस्टेरॉल शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करते. तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी मधुमेहाच्या मज्जातंतूंच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकते. या स्थितीत, पायांमध्ये संवेदना होत नाही, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पायावर फोड दिसत नाहीत जे पुढे अल्सरमध्ये विकसित होऊ शकतात.

हे व्यायाम उच्च कोलेस्ट्रॉल कमी करतात

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एरोबिक हा सर्वोत्तम व्यायाम आहे. याशिवाय, वेगवान चालणे किंवा जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, योगासने देखील उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing level of bad ldl cholesterol in your body can be seen in legs gps
First published on: 11-09-2022 at 12:37 IST