आपली जीवनशैली इतकी व्यस्त झाली की आपण पौष्टिक आहाराकडे लक्ष देत नाही. अन्नाच्या नावाखाली आपण सहज तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करतो, ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे की नाही हे सुद्धा आपण बघत नाही. बर्‍याचदा वेळेच्या कमतरतेमुळे आपण एकाच वेळी जास्त पदार्थ बनवतो आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो.

अनेक आरोग्य तज्ज्ञ शिजलेले अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात, पण किती दिवस? या प्रश्नाला उत्तर देताना लेखक कृष अशोक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये भारतात असा गैरसमज आहे की रेफ्रिजरेटरमुळे पोषक तत्वे नष्ट होतात.

इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने नेमके कोणते पोषक तत्व मिळतात? आणि किती पोषक तत्वे नष्ट होतात? पाण्यात विरघळणारे जीवनसत्वांमध्ये सर्वात अस्थिर आणि सहजपणे कमी होणारे पोषक तत्व असतात. तज्ज्ञांनी सांगितले की, बहुतेक पोषक तत्वे अन्न शिजवताना नष्ट होतात, अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने नाही. तज्ज्ञांनी सांगितले की, अन्न शिजवताना त्या अन्नातील जीवनसत्त्वे ननष्ट होतात फ्रिजमध्ये ठेवून नाही.

स्वयंपाक करताना पदार्थ गरम केल्याने त्यातले जीवनसत्त्वे नष्ट होतात, थंड वातावरणात ठेवल्याने नाही. खरं तर, हवाबंद डब्यात शिजवलेले बहुतेक अन्न किमान २ ते ३ दिवस टिकते आणि जास्तीत जास्त एक आठवड्यापर्यंत टिकून राहू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की फ्रीझरमधील अन्न सहा महिने टिकेल. तज्ज्ञांनी सांगितले की, भारतीय अन्न मसालेदार, खारट आणि आंबट असते, त्यामुळे हे अन्न फ्रीजसाठी योग्य आहे. आपण खरोखर शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवू शकतो का, हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

( हे ही वाचा: कॅन्सरपासून ते डायबिटीजपर्यंत ‘या’ ९ आजारांवर आवळा ठरेल वरदान! जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत)

फ्रीजमध्ये शिजवलेले अन्न किती काळ टिकते?

न्यूट्रिशनिस्ट आणि न्यूट्रसी लाइफस्टाइलचे सीईओ डॉ. रोहिणी पाटील यांच्या मते, मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी हे खराब होणारे पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत आणि काही दिवस ते आठवडाभरात ते वापरता येतील. तर फळे आणि भाज्या यासारखे खराब न होणारे पदार्थ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये ३ ते ४ दिवसांनी बॅक्टेरिया वाढू लागतात. या पदार्थांचे सेवन केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरिया सहसा अन्नाची चव आणि वास बदलत नाहीत, म्हणून ३ ते ४ दिवसांनी रेफ्रिजरेटरचे अन्न न खाणे महत्वाचे आहे.