Khajoor Water benefits: खजूर हे सर्वात पौष्टिक सुक्या फळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. शिवाय, खजुरामध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध असतात, ज्यामुळे ते प्रक्रिया केलेल्या साखरेसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनतात. तुम्ही केकमध्ये किंवा कदाचित स्मूदीमध्ये खजुराचा आनंद घेतला असेल, पण तुम्ही कधी त्याचे पाणी प्यायलं आहे का? खजुराचे पाणी खजुराइतकेच आरोग्यदायी आहे आणि ज्यांना साखरयुक्त पेये टाळायची आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पचनास मदत करण्यापासून ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यापर्यंत खजुराचे पाणी फायदेशीर ठरते. चला तर, हे खजुराचे पाणी कसे बनवायचे आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

खजूर पाण्याचे फायदे

पचनासाठी उत्तम

तुम्हाला जर पचनाची समस्या असेल तर खजुराच्या पाण्याचा आहारात समावेश करा, हे ड्रायफ्रूट फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे ते आपल्या पचनसंस्थेसाठी उत्तम बनते. तसेच बद्धकोष्ठतेसारख्या विकारांपासून मुक्त होण्यास मदत करते.

तुमच्या त्वचेसाठी चांगले

आरोग्यदायी चमकणारी आणि तरुण त्वचा असावी ही आपल्या सर्वांची इच्छा असते. तुम्हालाही चमकदार त्वचा हवी असेल तर खजुराचे पाणी प्यायला सुरुवात करा. खजुराचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. खजूर अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात, याचा अर्थ त्यांच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळण्यास मदत होईल.

रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात मदत

खजुराचे पाणीदेखील रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती खजूर खाऊ शकतात, परंतु त्याचे प्रमाण निश्चित करणे गरजेचे आहे. जर्नल ऑफ मेडिसिन फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या आहारात खजुराचा समावेश केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते.

हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन

खजुराचे पाणी तुमच्या हृदयासाठीदेखील फायदेशीर ठरू शकते. खजूर खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारू शकते. शिवाय, खजुरामध्ये उच्च फायबर सामग्री आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते. खजुराचे पाणी नियमितपणे प्यायल्याने हृदयाशी संबंधित समस्या टाळता येतात, तुमचे आरोग्य चांगले राहते.

हेही वाचा >> Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…

घरी खजुराचे पाणी कसे बनवायचे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात आधी ७, ८ खजूर घ्या त्यांना अर्धे कापून आणि बिया काढून टाका. आता एका मोठ्या पॅनमध्ये पाणी उकळवा, त्यात खजूर घाला आणि काही मिनिटे उकळवा. गॅस बंद करा आणि झाकून ठेवा. हे पाणी बाहेरच झाकून ६ ते ८ तास किंवा शक्यतो रात्रभर भिजू द्या. त्यानंतर हे पाणी तुम्ही पिऊ शकता.