Kitchen Hacks : किचनमधील स्टीलची भांडी सतत वापरत असाल तर ती काही महिन्यांनी काळपट दिसू लागतात. त्यांची चमक निघून जाते. मसाले आणि तेलामुळे चमचे चिकट होतात आणि कालांतराने अतिशय खराब दिसू लागतात. तुमच्याही किचनमधील चमचे आणि इतर स्टीलची भांडी काळपट दिसत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टीलचे चमचे, वाट्या आणि इतर सर्व भांडी काही मिनिटांत लखलखीत करू शकता.

या ट्रिक्समुळे स्टीलची भांडी दीर्घकाळ नव्यासारखी चमकताना दिसतील, यामुळे गंजलेली स्टीलची भांडीदेखील स्वच्छ करता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया सोप्या ट्रिक्स

स्टीलची भांडी चकचकीत करण्यासाठी सोप्या ट्रिक्स

१) सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी उकळून घ्या.
२) यानंतर त्यात मीठ आणि ॲल्युमिनियम फॉइल टाका.
३) बेकिंग सोडा घाला आणि नंतर ही भांडी त्यात टाका आणि उकळवा.
४) ५ ते १० मिनिटे भांडी गरम पाण्यात उकळल्यानंतर स्वच्छ होतील.
५) भांडी चमकू लागताच ती थंड पाण्याने स्वच्छ करा.
६) यानंतर एका कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
७) अशा प्रकारे तुमच्या घरातील स्टीलचे चमचे आणि इतर भांडी लखलखीत आणि स्वच्छ दिसू लागतील.

उद्योगपती आनंद महिंद्रांची पत्नी कोण आहेत? त्यांना नेमकी किती मुलं? त्यांचे शिक्षण अन् त्या काय करतात जाणून घ्या

‘या’ पद्धतीनं करा किचनमधील स्टीलची भांडी चकाचक

तुम्ही गरम पाणी आणि लिक्विड डिटर्जंटच्या मदतीनेही स्टीलची भांडी धुवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त गरम पाण्यात थोडेसे लिक्विड डिटर्जंट मिसळावे लागेल आणि नंतर ते भांड्यांना लावून तसेच ठेवा. मग ही भांडी घासून स्वच्छ करावीत. यानंतर ही भांडी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत आणि नंतर सुती कपड्याने स्वच्छ करावीत. अशाप्रकारे स्टीलची भांडी स्वच्छ करण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय तुम्ही ही भांडी बेकिंग सोडा गरम पाण्यात टाकूनही स्वच्छ करू शकता, त्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर ही भांडी स्वच्छ करा. अशा प्रकारे या भांड्यांची चमक परत येईल आणि ती पूर्वीसारखी चमकू लागतील.