Benefits of potato peel: बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण सर्वांना बटाट्याचे पदार्थ खायला आवडतात. बटाट्यापासून भाजी, टिक्की, पकोडे इत्यादी विविध खास पाककृती बनवता येतात. बर्‍याच लोकांना बटाटे इतके आवडतात की त्यांना प्रत्येक जेवणादरम्यान बटाट्याचा एक ना एक प्रकार खावासा वाटतो. बटाट्याचे प्रकार करताना आपण साले फेकून देतो, परंतु बटाट्याच्या सालीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पुन्हा यांना फेकणार नाही. GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी बटाट्याची साल मानवी शरीरासाठी का फायदेशीर आहे हे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बटाट्याच्या सालीपासून पोषक घटक मिळतात

बटाट्याच्या सालीला पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. यात पोटॅशियम भरपूर आहे आणि लोह देखील भरपूर आहे. याशिवाय बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी ३ देखील भरपूर असते.

बटाट्याच्या सालीचे फायदे

हृदयासाठी चांगले

बटाट्याची साल तुमच्या हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवते कारण त्यात उपस्थित पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या मदतीने रक्तदाब नियंत्रित राहतो.भारतात हृदयरुग्णांची संख्या खूप जास्त आहे. तर बटाट्याची साल अनेकांना उपयोगी पडू शकते.

( हे ही वाचा: Swine Flu Symptoms: देशात पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत; वेळीच जाणून घ्या त्याची लक्षणे)

कर्करोग प्रतिबंधित करते

बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर फायटोकेमिकल्स असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. यासोबतच या सालींमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड देखील आढळते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

हाडे मजबूत बनवा

जसे आपण सांगितले की बटाट्याच्या सालीमध्ये कॅल्शियमसारखे अनेक महत्त्वाचे खनिजे असतात, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्याचे काम करतात. याचे कारण म्हणजे त्यामुळे हाडांची घनता वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the surprising benefits of potato peels gps
First published on: 30-08-2022 at 20:25 IST