सर्दीनंतर सर्वात सामान्य त्रास म्हणजे डोकेदुखीचा… डोकेदुखी नक्की कशामुळे होते हे नक्की सांगता येत नसले तरी त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊयात…

आलेयुक्त चहा
आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं.

पाणी प्या 
शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.

स्ट्रेच करून पहा
अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.

गरम लवंग
डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

अॅक्युप्रेशर करा
अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.

लिंबू पाणी
शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.

बर्फाचा शेक
अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.

टरबूज खा
डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीर्घ श्वास घ्या आणि सोडा
ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.