Surya Namaskar Video : सूर्यनमस्कार हा अत्यंत महत्त्वाचा योग मानला जातो. हा एक प्रभावी व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कार केल्याने आरोग्याचे अनेक फायदे दिसून येतात. त्यामुळे तज्ज्ञासह योग अभ्यासक नियमित सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला देतात पण अनेकदा आपण सूर्यनमस्कार करताना काही चुका करतो आणि त्याचा काहीही आरोग्यास फायदा होत नाही. या चुका टाळल्यास आपण उत्तम सूर्यनमस्कार करू शकतो.
सोशल मीडियावर योग अभ्यासक मृणालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये त्या सूर्यनमस्कार करताना पाच चुका करू नका,असा सल्ला देतात. त्या पाच चुका कोणत्या, जाणून घेऊ या (never do these five mistakes while doing Surya Namaskar)

व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

१. घाई करणे

पटापट आणि जास्त सूर्यनमस्कार घालण्याच्या नादात आसन, श्वासांकडे दुर्लक्ष करणे

२.आसन पूर्ण न करणे

प्रत्येत आसन व्यवस्थित पूर्ण न करताच त्यापुढील आसनात जाणे

३. श्वासांकडे लक्ष न देणे

सूर्यनमस्कारामध्ये शारीरिक स्थितीबरोबर श्वासांचा समतोल राखणे, योग्य रितीने श्वासोच्छवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

४. शरीरावर जबरदस्ती करणे

सुरुवातीला प्रत्येक आसन अगदी योग्यप्रकारे जमत नाही पण तरी शरीरावर जास्त ताण देणे योग्य नाही.

५. सुरूवातीला वार्मअप आणि शेवटी शवासन करणे टाळणे

वेळ वाया जातो असे वाटून बरेच जण हे टाळतात पण त्यामुळे स्नायुंना दुखापत होऊ शकते आणि हवे तसे फायदे मिळत नाही.

हेही वाचा : दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, तुम्हालाही असे वाटते का? मग समज चुकीचा असू शकतो, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : लाल चेरी मधुमेहासह ‘या’ तीन समस्यांवर ठरेल रामबाण उपाय; किती व कधी खाल्ली पाहिजेत? पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या

yogamarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावर बरेच फायदे मिळतात; पण सूर्यनमस्काराचा अभ्यास करताना आपण व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही चुका केल्यास शरीरास फायदे मिळण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुद्दा बरोबर आहे. शरीराची हालचाल बरोबर करण्याच्या नादात मााझ श्वसनाकडे पूर्ण दुर्लक्ष होत.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली” एका युजरने सुचविले आहे,”सूर्यनमस्कार करताना श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या क्रियेवर व्हि़डीओ बनवा”