तातडीने अपडेट करा Google Chrome , हॅकिंगपासून वाचण्यासाठी ‘गुगल’चा सल्ला

जगभरात Google Chrome चे कोट्यवधी वापरकर्ते…

स्मार्टफोनचा किंवा संगणकाचा वापर करणाऱ्यांमध्ये गुगलच्या Chrome ब्राऊजरचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जगभरात Google Chrome चे कोट्यवधी वापरकर्ते आहेत. जर तुम्हीही Google Chrome चा वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, गुगलने सर्व क्रोम वापरकर्त्यांना तातडीने ब्राऊजर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. हॅकिंगपासून क्रोमला सुरक्षित करण्यासाठी एक नवे फिक्स रोलआऊट आणल्याचं गुगलने सांगितलं आहे. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकिंगची शक्यता बळावते त्यामुळे तातडीने अॅप अपडेट करण्याचा सल्ला गुगलकडून देण्यात आला आहे.

डिजिटल ट्रेन्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, नव्या अपडेटमध्ये गुगलकडून झीरो डे वल्नरबिलिटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यांची संख्या दोन होती. यातील एक ब्राऊजरच्या ऑडिओ कंपोनेंटला (CVE-2019-13720) आणि दुसरा PDFium (CVE-2019-13721) लायब्रेरीला प्रभावित करायचा.

आणखी वाचा- दर महिन्याला 35 रुपये द्यायची गरज नाही, व्होडाफोनने आणले ‘स्वस्त’ प्लान्स

येत्या काळात क्रोमचं नवं व्हर्जन सर्व युजर्सला वापरता येणार आहे. जुन्या व्हर्जनमध्ये हँकिंगची शक्यता अधिक होती. जुन्या व्हर्जनमध्ये हॅकर्स सहजतेने ब्राऊझर मेमरीमध्ये डेटा स्टोर करुन करप्ट किंवा मोडिफाय करु शकायचे. याच धोक्यामुळे फिक्स रोलआउट आणल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New google chrome security alert update your browsers sas

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या