जपानच्या शाळा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे जपानने मुलींवर लावलेले निर्बंध. अंतर्वस्त्रांचा रंग आणि प्रकारावर तर निर्बंध आहेतच मात्र आता मुलींनी पोनीटेल बांधण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे जपानमधल्या शाळा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
जपानमध्ये मुलींवर विचित्र निर्बंध लादण्यात आले आहेत. या विचित्र निर्बंधांनंतर जपानमधील शाळा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.अलीकडेच जपानमधील शाळांनी मुलींना पोनीटेल बांधण्यास बंदी घातली आहे.
मुलींनी पोनीटेल बांधल्याने मुले उत्तेजित होऊ शकतात, असं अजब कारण जपानच्या शाळांनी दिलं आहे. मुलींच्या मानेचा मागचा भाग मुलांना लैंगिक उत्तेजित करू शकतो, असा या बंदीमागचा तर्क आहे. त्यामुळेच आता तिथल्या शाळेत शिकणाऱ्या मुली पोनीटेल बांधून शाळेत जाऊ शकत नाहीत.
‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, येथील अनेक शाळांमध्ये मुलांच्या सॉक्सच्या आकारापासून ते अंतर्वस्त्राच्या रंगापर्यंत विचित्र नियम लागू करण्यात आले आहेत. एका नियमानुसार येथील शाळेत शिकणाऱ्या मुली फक्त पांढऱ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान करून येऊ शकतात. याशिवाय शाळेत कोणतीही मुलगी केस कलर करु शकत नाही.