गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील काळ असतो. यामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. तसेच गरोदरपणात शरीराच्या कोणत्याही भागात दिसणार्‍या असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळेच अशा परिस्थितीत कोणत्याही गोष्टची रिस्क घेण्यापेक्षा तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. आई होणार असल्याची चाहुल लागलाच प्रत्येक महिला स्वत:ची आणि गर्भातील बाळाची अधिक काळजी घेऊ लागते.

आरोग्यासाठी गर्भधारणेदरम्यान पोटदुखी होण्याची अनेक संभाव्य कारणे आहेत. कधीकधी ते फक्त गॅस किंवा बद्धकोष्ठतेमुळे असू शकते. परंतु कधीकधी हे गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. तसेच तुमच्या ओटीपोटात दुखणे हे गर्भधारणेशी संबंधित नसलेल्या समस्येचे देखील लक्षण असू शकते, जसे की अॅपेन्डिसाइटिस, ओव्हेरियन सिस्ट्स, किडनी समस्या, युरेथ्रल इन्फेक्शन (यूटीआय) इत्यादी समस्या असू शकतात. दरम्यान गरोदरपणात पोटदुखीची कारणे कोणती असू शकतात ते जाणून घेऊयात…

गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या

बद्धकोष्ठता किंवा गॅस हे देखील गरोदरपणात पोटदुखीचे कारण असू शकते. त्यामुळे वेदना सतत वाढत जातात आणि आंबट ढेकर आणि उलटीची समस्या सुरू होते. असे झाल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भाशयाच्या वाढीची कारणे

गर्भाशयाच्या वाढीमुळे देखील पोटदुखी होते. यासोबतच उलट्या होण्याचीही शक्यता असते. यासाठी तुम्ही सतत काही ना काही कमी प्रमाणात खात राहणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

गर्भपाताचे लक्षण

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात होण्याचा धोका देखील असतो. अशा स्थितीत तुमच्या खालच्या ओटीपोटात मुरगळ येते आणि पोटात वेदना आणि रक्तस्त्राव होतो. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे रक्तस्त्राव. हा रक्तस्त्राव अनेक दिवस अधूनमधून होऊ शकतो. जर असे होत असेल तर तुमच्या डॉक्टरांना नक्की सांगा.अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा.

एक्टोपिक गर्भधारणा देखील एक कारण आहे

एक्टोपिक गर्भधारणा ही अशी गर्भधारणा आहे ज्यामध्ये गर्भ गर्भाशयाच्या बाहेर विकसित होतो. दुर्दैवाने, अशी गर्भधारणा जतन केली जाऊ शकत नाही. ही एक गंभीर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पोटात खूप तीव्र वेदना होतात. ही वेदना हळूहळू संपूर्ण ओटीपोटात होऊ लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूरिनमार्गाच्या भागात होणारे इन्फेक्शन

गर्भधारणेदरम्यान यूरिनमार्गाच्या भागात होणारे इन्फेक्शन कडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्यामुळे पोटदुखी, जळजळ होणे, उलट्या होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. याची वेळीच काळजी घेतली नाही, तर पुढे किडनीला इन्फेक्शन होऊ शकतो.