शाओमी कंपनीने आपला लोकप्रिय Poco F1 हा स्मार्टफोन Poco Days सेलमध्ये कमी किंमतीत उपलब्ध केला आहे. फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर 5 जुनपासून Poco Days सेल सुरू झाला असून 9 जुनपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या दरम्यान, Poco F1 स्मार्टफोनच्या बेसिंक व्हेरिअंटच्या (6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज) किंमतीत दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी, 9 जुनपर्यंत हा स्मार्टफोन 17 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

तीन व्हेरिअंट्समध्ये Poco F1 हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे इंफ्रारेड फेस अनलॉक फीचर. या फीचरच्या मदतीने तुम्ही अंधारात असो, किंवा उजेडात, चेहऱ्याच्या मदतीने फोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या फोनमध्ये दमदार प्रोसेसर देण्यात आलं आहे. क्वालकॉम फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरमुळे जर अतिवापरामुळे फोन गरम झाल्यास आपोआप कूलिंग होईल. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम / 64 जीबी इंटरनल स्टोरेज, 6 जीबी रॅम / 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे.

या फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 4000mah ची बॅटरी फोनमध्ये देण्यात आली असून अॅन्ड्रॉइड 8.1 ओरियो आधारित मीयुआय 9.6 प्रणालीवर हा फोन कार्यरत राहिल. फोनचा मागील भाग पॉलीकार्बोनेट ब्लॅक रंगाचा आहे. रोस्सो रेड , स्टील ब्ल्यू आणि ग्रॅफाइट ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.