पब्जी मोबाइलनंतर आता भारतात पुन्हा लॉन्च होणार SHEIN ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म!

या महिन्याच्या शेवटी लोकप्रिय शीन (SHEIN ) ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप भारतात परत येणार आहे. स्वस्तात कपडे खरेदी करण्यासाठी हे अ‍ॅप प्रसिध्द होते.

SHEIN App SHEIN launch date
पब्जी मोबाइलनंतर भारतात परत येणारे शीन (SHEIN ) हे दुसरे अॅप आहे.

भारत सरकारने गेल्या वर्षी देशात शेकडो चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. या अ‍ॅप्समध्ये अनेकांचे आवडते अ‍ॅप्स होते. ते अ‍ॅप्स पुन्हा भारतात कधी येतील याची लोकं आवर्जून वाट पाहत आहेत. बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक, गेमिंग अ‍ॅप पब्जी मोबाइल, कॅमस्कॅनर डॉक्युमेंट स्कॅनिंग अॅप, शीन (SHEIN ) ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप समाविष्ट होते. देशातील बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया म्हणून पब्जी मोबाइल परत आल्यानंतर, शीन  ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म लवकरच भारतात परत येत आहे. शॉपिंगची आवडत असलेल्या प्रत्येकासाठी ही आनंदाची आणि महत्वाची घोषणा आहे.

कधी, कसं आणि कुठे वापरता येणार शीन (SHEIN )?

अॅमेझॉन प्राइम डे सेलच्या दरम्यान शीन भारतात अॅमेझॉनवर पुन्हा लॉन्च होईल. आधीसारखे शीनचे स्वतंत्र अ‍ॅप असणार नाही. अॅमेझॉन प्राइम डे सेल २०२१ २६ जुलैच्या मध्यरात्र पासून देशात सुरू होईल आणि २७ जुलै पर्यंत सुरू राहील. सेल दरम्यान काही श्रेणीतील अनेक उत्पादने मोठ्या प्रमाणात सवलतीत उपलब्ध असतील.

प्रसिद्ध शीन अ‍ॅपबद्दल..

गेल्या वर्षी याच काळात पब्जी मोबाइल आणि टिकटॉक सारख्या लोकप्रिय अॅप्ससह शीन ऑनलाइन शॉपिंग अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर लवकरच चीनचे ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप दोन्ही गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल अ‍ॅप स्टोअर वरून काढले गेले. शीन नेहमीच तरुणींनमध्ये लोकप्रिय होते. या अॅपवर शेकडो प्रकारच्या स्टाईलचे कपडे तेही बजेटमध्ये उपलब्ध असायचे. कॉलेज विद्यार्थिनी आणि युट्युबर्समध्ये हे अॅप प्रसिद्ध होते. युट्युबवरती आजही या अॅपच्या कपड्यांवरचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shein launch date shein set to make comeback in india on amazon prime days ttg