बाल्कनीत किंवा छतावर बसणाऱ्या कबुतरांमुळे अनेक घरांची शांतता हरवलीये! सकाळी उठताच खिडकीबाहेरचा त्रासदायक गुटरगूं आवाज, भिंतींवर पिसं, आणि कपड्यांवर पडलेली घाण — यामुळे अनेकांना वैताग आलाय. इतकंच नव्हे तर, कबुतरांचं विष्ठेमुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.बहुतेक लोकांना त्यांच्या छतावर आणि बाल्कनीत येणाऱ्या कबुतरांचा त्रास होतो. कबुतरे बाल्कनीत, छतावर आणि खिडक्यांच्या चौकटीत बसतात आणि त्यामुळे अस्वच्छता होते. कबुतरांची विष्ठा साफ करणे कठीणच आहेच पण त्यामुळे हवेत जंतू पसरतात. हे जंतू अॅलर्जी, श्वसनाचे आजार आणि संक्रमण वाढवू शकतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर ठरतो.
बाल्कनीत व छतावर सतत येणाऱ्या कबुतरांच्या उच्छादामुळे अनेकांचा त्रास सातत्याने वाढतोय! घरभर पिसं, घाण, आणि आवाज — यातून सुटका होणार नाही असं तुम्हालाही वाटतंय का? मग आता तयार राहा शांततेचा अनुभव घ्यायला, कारण काही अगदी सोपे पण जबरदस्त घरगुती उपाय तुमचं घर कबुतरमुक्त करू शकतात. काळजी करू नका! काही अगदी सोपे, घरगुती आणि परवडणारे उपाय करून तुम्ही या कबुतरांच्या त्रासातून कायमची सुटका मिळवू शकता. हे उपाय इतके प्रभावी आहेत की, एकदा केले की कबुतरं तुमच्या घराजवळ फिरकणंही टाळतील!
हे उपाय केल्यावर एकही कबूतर घराजवळ फिरकणार नाही!
लोक कबुतरांना त्यांच्या घरातून आणि बाल्कनीतून हाकलण्यासाठी विविध उपाय वापरतात. काही जण रासायनिक औषधं किंवा पावडर वापरतात, पण ती कबुतरांसाठी हानिकारक आणि पर्यावरणासाठीही अपायकारक ठरतात. म्हणून, घरगुती आणि सुरक्षित उपाय करणं अधिक योग्य ठरतं. वाचा सोपे उपाय
- कबुतरांपासून सुटका मिळवण्यासाठी, प्रथम तुमची बाल्कनी आणि छत स्वच्छ ठेवा. कबुतरांना घाणेरडे आणि धुळीचे ठिकाण आवडते. म्हणून, तुमचे छत आणि बाल्कनी नियमितपणे स्वच्छ करा.
- तुम्ही तुमच्या बाल्कनीत जाळी देखील बसवू शकता. यामुळे कबुतरांना आत जाण्यापासून रोखता येईल. बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे पक्ष्यांना दूर ठेवणाऱ्या जाळ्या सहज मिळू शकतात, जे तुम्ही बसवू शकता. यामुळे कबुतरांना आत जाण्यापासून रोखता येईल.
- तुम्ही तुमच्या बाल्कनीवर लिंबू किंवा व्हिनेगर देखील फवारू शकता. कबुतरांना हा वास आवडत नाही. त्यांना घाबरवण्यासाठी तुम्ही बनावट घुबड किंवा गरुडाचे मॉडेल देखील ठेवू शकता. यामुळे कबुतरांनाही त्रास होईल.
- लोक अनेकदा छतावर किंवा बाल्कनीवर अन्नपदार्थ सोडतात. कबुतरे अनेकदा ते खाण्यासाठी येतात. म्हणून, बाल्कनीवर किंवा छतावर कधीही धान्य किंवा उरलेले अन्न सोडू नका.
कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसरोगाचा वाढता धोका; उपचारही कठीण, तज्ज्ञांची इशारा
कबुतरांच्या विष्ठेमुळे गंभीर फुफ्फुसरोग होऊ शकतो, ज्यावर उपचार करणे कठीण असते. पुणे येथील Pulmocare Research and Education (PURE) फाउंडेशनचे संचालक डॉ. सुंदीप साल्वी यांच्या मते, कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपरसेन्सिटिव्ह प्न्युमोनायटिस (Hypersensitivity Pneumonitis) नावाचा फुफ्फुसाचा दीर्घकालीन आजार होतो. रुग्णांना विशेषतः चालताना श्वास घ्यायला त्रास, सततचा खोकला आणि दम लागणे अशी लक्षणे दिसतात.
रुबी हॉल क्लिनिकचे फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी यांनी सांगितले की, कबुतरांच्या विष्ठेमधील प्रथिन घटक वाळल्यानंतरही हवेत मिसळतात आणि त्यांचा श्वासाद्वारे शरीरात प्रवेश होऊन फुफ्फुसांमध्ये दाह निर्माण करतात. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास फुफ्फुसांमध्ये कायमस्वरूपी नुकसान (fibrosis) होते, ज्यामुळे काही रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन घ्यावा लागतो.
उपचारासाठी उच्च प्रतीचे HRCT स्कॅन उपयुक्त ठरते. वेळेत निदान आणि corticosteroid औषधांनी उपचार शक्य आहेत, परंतु उशीर झाल्यास आजार गंभीर स्वरूप घेतो.
वन्यजीव तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांच्या मते, कबुतरांनी आता शहरात वास्तव्य केल्याने त्यांच्या विष्ठेमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे कबुतरांना मोठ्या प्रमाणात अन्न देणे टाळावे, जाळ्या लावून त्यांना घराजवळ घरटे बांधण्यापासून रोखावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे त्यांनी आवाहन केले.
(टीप -वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)
