वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, हृदयविकार हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जर आपण हृदयाच्या विकारांबद्दल बोललो, तर त्यात CVD, कोरोनरी हृदयरोग, सेरेब्रोव्हस्कुलर रोग, संधिवाताचा हृदयरोग आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. अंदाजे १७.९ दशलक्ष लोक दरवर्षी हृदयाशी संबंधित आजारांमुळे मरतात.

हृदयविकाराशी संबंधित आजारांनी ग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांमध्ये हृदयाच्या आरोग्याविषयी माहितीचा अभाव हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. हृदयाचे आरोग्य बिघडले की लगेच शरीरात लक्षणे दिसू लागतात. जागरूकतेच्या अभावामुळे ही लक्षणे सहज दुर्लक्षित होतात. कालांतराने हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल्युअर यांसारख्या आजारांचा धोका असतो.

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

( हे ही वाचा: तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनते अमृत; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही)

हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल होणं म्हणजे काय?

जेव्हा हृदयाच्या स्नायूला नुकसान होते किंवा हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी होते. त्यावेळी हृदय आजारी पडते. हृदयाच्या वाल्व दोष, उच्च रक्तदाब किंवा अनुवांशिक रोग ही देखील हृदयाच्या फेल होण्याची प्रमुख कारणे असू शकतात. कारण काहीही असो, निकामी होणारे हृदय शरीराची ऑक्सिजनयुक्त रक्ताची गरज भागवण्यासाठी पुरेसे पंप करू शकत नाही.

हृदय फेल होण्याची लक्षणे काय आहेत?

हार्ट फेल झालेली व्यक्ती खूप थकलेली दिसते. याचे कारण असे की हृदय शरीराच्या ऊर्जेच्या गरजेसाठी पुरेसा ऑक्सिजन पंप करू शकत नाही. यामुळे माणसाला खूप थकवा जाणवतो. महत्त्वाचे म्हणजे, व्यक्ती साधी दैनंदिन कामेही करू शकत नाही. या व्यक्तीला लगेच थकवा जाणवतो.

दैनंदिन कामात अडचण

हृदयविकाराने त्रस्त असलेले लोक नियमित दैनंदिन कामेही करू शकत नाहीत. या लोकांच्या शरीरात तेवढी ताकद नसते. ते कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

( हे ही वाचा: मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय? तर जाणून घ्या यावर योग्य उपचार)

धाप लागणे

ज्या लोकांना हृदयविकार आहे त्यांना सतत खोकला, अस्वस्थता आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे जाणवतात. अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. सर्व प्रथम डॉक्टरांशी बोलावे.

टाच आणि घोट्यात त्रास

जेव्हा वापरलेले रक्त खालच्या अंगातून परत पंप करण्यासाठी हृदयाकडे पुरेशी पंपिंग शक्ती नसते. त्यामुळे घोटे, पाय, मांड्या आणि पोटात द्रव साचतो. जास्त द्रवपदार्थामुळे अनेक लोकांमध्ये वजन वाढू शकते. वजन जास्त असल्याने हृदयावरही परिणाम होतो.

( हे ही वाचा: Piles Control: मांसाहारामुळे वाढू शकते मूळव्याधची समस्या; जाणून घ्या नियंत्रणासाठी कोणता आहार आहे आवश्यक)

भूक न लागणे, मळमळ होणे

एखाद्याच्या पचनसंस्थेला कमी रक्त मिळते, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवतात. त्यामुळे भूक न लागणे आणि अगदी मळमळ यासारखी लक्षणे दिसून येतील. ही लक्षणे देखील हृदयाशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

हृदयाचे ठोके वाढणे

जर तुमच्या हृदयाची गती वेगाने वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे लवकर ओळखणे आणि योग्य सल्ला किंवा उपचार केल्याने स्थितीत सुधारणा होऊ शकते. अनेकदा यामुळे हृदयाच्या ठोक्यांकडे दुर्लक्ष करून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.