Yogasana To Increase Height And Concentration : जर मुलांना चांगला आहार आणि चांगली शारीरिक हालचाल करूनही उंची वाढत नसेल तर योगासन फायदेशीर ठरू शकते. योगाचा नियमित केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. मुलांचे उंची वाढण्यासाठी आणि शक्ती वाढवण्यासाठी हे पाच आसान खूप कामी येऊ शकतात.
मुलांच्या उंची आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ५ योगासने
ताडासन
ताडासनाचे अनेक फायदे आहेत. हे रक्ताभिसरण गतिमान करते, गुडघे आणि घोट्यासारखे सांधे मजबूत करते, थकवा कमी करते आणि हृदय निरोगी ठेवते. त्यामुळे मुलांची मानसिक व शारीरिक वाढ चांगली होते.
वृक्षासन
वृक्षासन केल्याने खांदे आणि मांड्यांची ताकद वाढते. मुलांची उंची वाढवण्यासाठी हे खूप चांगले आसन आहे. या आसनाचा सराव केल्याने वाढत्या वयात उंची वाढण्यास मदत होते.
बद्ध कोणासन/ फुलपाखराची मुद्रा
बद्ध कोणासन किंवा फुलपाखराची मुद्रा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. जे मुले अभ्यासासाठी उशिरापर्यंत जागतात त्यांना या आसनामुळे आराम मिळण्यास मदत होते.
हेही वाचा – शाळेच्या ड्रेसवर पडलेले शाईचे डाग निघत नाहीत? मग वापरा ‘या’ टिप्स, डाग काही मिनिटांत होतील गायब
उस्त्रासन
उस्त्रासनामुळे किडनी निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते आणि शारीरिक मुद्रा सुधारते. पचनक्रिया चांगली राहते ज्याचा मुलांच्या विकासावर सकारात्मक परिणाम होतो.
शशांकसन
शशांकसनमुळे शरीर मजबूत आणि लवचिक होते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते ज्याचा थेट परिणाम मुलांच्या विकासावर होतो. या आसनामुळे मानसिक समस्याही कमी होण्यास मदत होते.