Does Washing Fruits & Vegetables: आपल्या जेवणात जास्त करून चपाती, भाजी, डाळ यांसारखे पदार्थ असतात. पण आपण हे पदार्थ कधीकधी चवदार बनवण्याच्या प्रक्रियेत इतके शिजवतो की त्यामध्ये कोणतेही पोषण शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपण खातो त्या पदार्थांचे पोषण जाणून घेणे आणि नंतर ते शिजवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपण भाज्या कापताना काही भाज्या कापून धुतो तर काही भाज्या धुवून कापतो. पण काही भाज्या अशा आहेत ज्या कापून धुतल्या नाही पाहिजेत. याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर चला जाणून घेऊया…

कापण्यापूर्वी गरम पाण्यात भाज्या ठेवा

साधारणपणे हंगामात मिळणाऱ्या भाज्याच खाव्यात. शक्यतोवर भाज्या आणि फळे सालेसोबत खाण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते. मात्र, आजकाल भाज्यांवर अनेक प्रकारची हानिकारक कीटकनाशके फवारली जातात. म्हणून, कापण्यापूर्वी, त्यांना पाच मिनिटे गरम पाण्यात बुडवून चांगले धुवा, कारण कापल्यानंतर भाज्या धुतल्याने त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. विशेषत: थंडीत मिळणाऱ्या भाज्या (पालक, मेथी, गाजर, मुळा) कापून धुवू नयेत, त्यातील पोषक तत्व पाण्याद्वारे धुऊन जातात. त्यामुळे भाज्या कापण्यापूर्वी नीट धुवून घ्या.

जास्त वेळ भाज्या शिजवू नका

हिरव्या भाज्या जास्त वेळ शिजवू नका कारण त्यामुळे त्यातील खनिजे नष्ट होतात, पण गाजर जास्त वेळ शिजवावे कारण जास्त वेळ शिजवल्याने त्यात असलेले लाइकोपीन या पोषक तत्वाचे प्रमाण वाढते. उकडलेले किंवा भाजलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. फ्रेंच फ्राईज किंवा आलू टिक्की यासारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट आणि चरबीचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते.

( हे ही वाचा: दुधात ‘या’ ३ गोष्टी मिसळल्यास बनतात अमृतासमान; याच्या सेवनाने रक्तातील साखर झपाट्याने कमी होऊ शकते)

भाज्यांचे मोठे तुकडे करा

असे म्हणतात की भाजी जितकी बारीक कापली जाईल तितकी ती शिजेपर्यंत त्यातील पोषक तत्वे कमी होतात. आपल्यापैकी बहुतेकजण भाज्या शिजवण्याच्या १ ते २ तास आधी चिरतात आणि या दरम्यान बारीक चिरलेल्या भाज्या त्यांची चव गमावतात. यामुळेच बारीक चिरलेल्या भाज्या ताबडतोब शिजवल्या पाहिजेत, जेणेकरून त्यातील पोषक घटक टिकून राहतील. जर तुम्ही स्वयंपाक करण्यापूर्वी काही तास भाज्या कापल्या तर भाज्यांचे मोठे तुकडे करा.

भाज्या कापताना या गोष्टी लक्षात ठेवा

भाज्यांमध्ये जास्तीत जास्त पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्याची आणखी एक युक्ती म्हणजे आपल्या भाज्या बारीक सोलणे. भाजीची पातळ साले काढून भाजीचा कोणताही भाग खराब होणार नाही हे लक्षात ठेवा. अशाप्रकारे, भाजीपाल्याचा अपव्यय तर कमी होईलच, शिवाय सालीमध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे पोषणही होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व भाज्या सोलू नका

सर्व भाज्या शिजवण्यापूर्वी सोलण्याची गरज नाही, कारण त्याशिवाय अनेक भाज्या शिजवल्या जाऊ शकतात. गाजर, मुळा आणि काकडी यांसारख्या भाज्या त्यांच्या त्वचेतील काही आवश्यक पोषक घटक गमावतात. जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी, भाज्या नीट धुवून न सोलता खा.