कुठलेही ताणावपूर्ण काम करताना किंवा समस्यांना तोंड देताना तुम्हाला चिंता सतावू शकते. चिंता ही सर्वात सामान्य मानसिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. तज्ज्ञांच्या मते काम, शाळा, आर्थिक समस्या आणि वैयक्तिक समस्या या घटनांमधून चिंताग्रस्त मनाची स्थिती निर्माण होते. काही लोक चिंतेने टोकाचे पाऊल देखील उचलतात. त्यामुळे, चिंता करू नये असे चिकित्सक देखील सल्ला देतात. तरी जर ती होत असेल तर काही उपाय चिंता घालवण्यात मदत करू शकतात.

१) श्वासोच्छवासाचा व्यायाम

४ सेकंद श्वास घ्या, मग ४ सेकंद श्वास धरून ठेवा आणि ४ सेकंद श्वास सोडा. पुन्हा ४ सेकंद श्वास धरून ठेवा आणि ही प्रक्रिया मन शांत करण्यासाठी पुन्हा करत राहा.

२) शरीर स्कॅन करा

चिंता वाटल्यास शरीराचे स्कॅन करा असा सल्ला तज्ज्ञ देतात. शरीराच्या विविध अवयवांवर आणि शरीराच्या संवेदनांवर पायांपासून डोक्यापर्यंत हळूहळू लक्ष केंद्रित केले पाहिजे.

(बाळ कसे शांत होते? संशोधकांच्या अभ्यासातून मिळाले ‘हे’ उत्तर)

३) गाणे ऐका

तुम्हाला शांत करणारे, तुमची चिंता कमी करणारे तुमचे आवडते गाणे ऐका. गाणे ऐकताना इतर गोष्टी मनात येत नाही. लक्ष गाण्यावर केंद्रित असल्याने असे होते. त्यामुळे तुमचे आवडते गाणे ऐकल्याने चिंता कमी करण्यात मदत होऊ शकते.

४) लिहिण्याने चिंता कमी होऊ शकते

तुमच्या मनातील विचार लिहित चला. याने तुमचे मन हलके होईल. मनात सुरू असलेले विचार लिहिल्याने गोंधळ कमी होऊ शकतो. आणि नेमकं कशामुळे आपल्याला चिंता होत आहे हे कळू शकेल.

५) पर्यावरणाविषयी जागरूक

चिंता घालवण्यासाठी आपले पर्यावरण मदत करू शकते. पर्यावरणातील आवाज ऐका किंवा वातावरणातील सुगंध ओळखा किंवा खायचे पदार्थ चाखून बघा, त्याची चव ओळखा. याने चिंता दूर होण्यात किंवा त्यापासून लक्ष इतरत्र वळवण्यात मदत होईल.

६) पाणी प्या, ध्यान करा
कोमट पाणी थोडे थोड प्या. तसेच ध्यान करा, याने चिंता कमी करण्यात मदत होऊ शकते. तसेच ध्यान केल्याने मन शांत होते.

७) व्यायाम करा

चिंता ही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चिंता कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करा. योग तुमचे तणाव कमी करू शकते.

(आळसपणासह ‘या’ ६ सवयी वेळीच टाळा, अन्यथा मधुमेहाचा धोका वाढेल)

८) कॅफिन टाळा
तुम्हाला दररोज चिंता सतावत असेल तर कॅफिन आणि सोडा सारख्या पदार्थांचे सेवन बंद करा. मद्य आणि धुम्रपान देखील टाळा.

९) तज्ज्ञांचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काहीच होत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या. विषयात तज्ञ असल्याने त्यांचा सल्ला चिंतेपासून मुक्ती मिळवण्यात मदत करू शकतो.