अयोग्य जीवनपद्धती आणि खानपान यामुळे लोक जास्त करून थायरॉइड आणि युरिक अ‍ॅसिडच्या आजाराने त्रस्त असतात. आधी फक्त वयस्कर लोकांना होणारे आजार आता तरुण पिढीतील लोकांनाही सर्रास होत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉइडचा धोका दुप्पट असल्याचं सांगितलं जातं. १८ ते ३५ वर्षाच्या महिला, मुख्यतः गरोदर महिलांनी या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वतःची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. थायरॉईड ग्रंथीतून बाहेर पडणारा थायरॉक्सिन हा हार्मोन मानवी हालचालींकरिता मर्यादित प्रमाणात आवश्यक आहे.

रक्तातील यूरिक ऍसिड हे एक प्रकारचे रसायन आहे, जे शरीरातील प्युरिन नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने तयार होते. मूत्रपिंडांद्वारे फिल्टर केल्यानंतर बहुतेक यूरिक ऍसिड शरीरातून बाहेर फेकले जाते, परंतु जेव्हा मूत्रपिंड हे टाकाऊ पदार्थ फिल्टर करू शकत नाही, तेव्हा ते यूरिक ऍसिड क्रिस्टल्सच्या रूपात तुटते आणि हाडांमध्ये गोळा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे संधिरोग होऊ शकतो. अशावेळी थायरॉईड आणि युरिक अ‍ॅसिड टाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारातील समावेश टाळावा जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच

फ्लॉवर आणि कोबी :

आरोग्य तज्ञांच्या मते, ज्या रुग्णांना थायरॉइडची समस्या आहे त्यांनी फ्लॉवर आणि कोबीचे सेवन पूर्णपणे टाळावे. त्याचबरोबर ब्रोकोलीचे सेवन सुद्धा या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. या भाज्यांमध्ये गाइट्रोगनचे प्रमाण अधिक असते आणि हे तत्त्व शरीरातील थायरॉइडला वाढवण्याचे काम करते. तसेच या भाज्यांमध्ये असलेले फायबर थायरॉइडच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतात.

उच्च युरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांनी करू नये कोबी आणि मशरूमचे सेवन :

अनेकांना मशरूम आणि कोबीची भाजी आवडते. पण या दोन्ही भाज्यांमध्ये प्युरिनची मात्र अधिक असते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. आरोग्य तज्ञसुद्धा युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांना या भाज्या न खाण्याचा सल्ला देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉफी आणि ग्लूटेनयुक्त पदार्थ

थायरॉइडच्या रुग्णांनी कॉफी आणि ग्लूटेनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. तर, युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी लाल मांस, राजमा, वाटणे आणि हाय प्रोटीन डाईट ज्यात खासकरून प्युरीनची मात्र अधिक असते अशा पदार्थांचे सेवन टाळावे.