scorecardresearch

पहिल्यांदाच डेटवर जाताय..? मग पहिली भेट शेवटची ठरू नये म्हणून या गोष्टी एकदा वाचाच !

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जर तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असाल, अनेकदा आपण गोंधळून जातो आणि नकळत आपल्या हातून काही चुका होतात. या चुकांमुळे कधी कधी पहिली भेट शेवटची ठरते. तुमच्या बाबतीतही असं होऊ नये म्हणून या टिप्स एकदा नक्की वाचा.

Valentines-Day-2022
(File Photo)

फर्स्ट इम्प्रेस इज लास्ट इम्प्रेशन असं अनेकदा बोलताना तुम्ही ऐकलं असेल. कुणालाच्या लव्हस्टोरीबद्दल विचारलं तर ते आवर्जून त्यांच्या पहिल्या भेटीबाबत सांगायला विसरत नाहीत. पहिल्या भेटीच्या अनेक आठवणी कपल्स अगदी रंगवून सांगत असतात. १४ फेब्रूवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेक कपल्स पहिल्यांदा भेटीचा प्लॅन करतात. यंदाच्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जर तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असाल, अनेकदा आपण गोंधळून जातो आणि नकळत आपल्या हातून काही चुका होतात. या चुकांमुळे कधी कधी पहिली भेट शेवटची ठरते. तुमच्या बाबतीतही असं होऊ नये म्हणून या टिप्स एकदा नक्की वाचा.

सक्ती करू नका
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डेटवर जात असाल तर जोडीदाराच्या सोईचे भान ठेवा. त्यांना ज्या ठिकाणी जायचे नाही तिथे जाण्यासाठी सांगू नका. तुम्ही काही खात-पित असाल तर जोडीदाराच्या आवडी निवडीबाबत त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. तुमच्या जोडीदारासोबत हट्ट किंवा जबरदस्ती करण्याऐवजी तुमच्या जोडीदाराला काय आवडतं यावर लक्ष केंद्रित करा.

आणखी वाचा : ‘या’ कारणासाठी हनिमूनला जोडप्यांची रूम गुलाबाच्या फुलांनी सजवली जाते

पहिली मैत्री
जर तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती आधीच तुमचे मित्र-मैत्रिणी असतील तर तुमच्या भावनांसमोर ती मैत्री विसरू नका. प्रेमाच्या नादात मैत्री खराब करू नका. जोडीदाराला लाल गुलाब घ्यायचा नसेल तर त्याला पिवळा गुलाब देऊन मैत्री टिकवा. दुसरीकडे, जर त्याने तुमचा लाल गुलाब ठेवला तर तुम्ही त्याला प्रपोज करू शकता.

आणखी वाचा : Valentine’s Day 2022: व्हॅलेंटाईन डे चे हे Messages, WhatsApp Status पाठवून तुमच्या जोडीदाराला करा इम्प्रेस!

प्रपोजची स्टाईल
जर तुम्ही तुमच्या पार्टनरला डेटवर प्रपोज करणार असाल तर त्याला काही खास आणि रोमँटिक पद्धतीने सांगा म्हणजे पार्टनर तुमचा प्रपोजल स्वीकारेल. परंतु त्याने तुमचा प्रस्ताव स्वीकारला नाही तरीही तुमचे वागणे बदलू नका. त्यांचे मन वळवू नका किंवा त्यांच्याशी वारंवार वाद घालू नका. कदाचित जोडीदाराला विचार करायला वेळ लागेल किंवा तो अचानक आलेल्या प्रपोजलवर योग्य प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. पण त्यावेळी जर तुम्ही त्यांच्या भावनांची कदर केली तर तो नंतर तुमच्या प्रपोजलला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकेल.

इकडच्या तिकडच्या विषयावर बोलणं टाळा
पहिल्यांदा डेटवर जाताना आत्मविश्वास बाळगा. घाबरणं आणि संकोच दाखवू नका. जोडीदाराशी इकडच्या तिकडच्या विषयावर जास्त बोलू नका. त्यांचं म्हणणं ऐका आणि समजून घ्या. घाई करण्याऐवजी आपल्या भावना मोकळ्या मनाने व्यक्त करा. वैयक्तिक प्रश्नांचा अतिरेक करू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2022 at 21:55 IST
ताज्या बातम्या