Best Wedding Dresses : लग्न आणि विधी समारंभासाठी बेस्ट वेडिंग आउटफिट्स; सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळून रहातील

प्रत्येक मुलीसाठी तिचं लग्न हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. लग्न म्हणजे केवळ काही तासांची पूजा किंवा कार्य नसून कुटुंबासाठी एक उत्सव असतो. या खास दिवशी प्रत्येक मुलगी ही तिच्या ड्रेसेस पासून ते मेकअप पर्यंत सर्व गोष्टींची तयारी करत असतात. म्हणून घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास टिप्स…

wedding-dresses-for-bride
(Image Source: Instagram)

Outfits ideas for bride : प्रत्येक मुलीसाठी तिचं लग्न हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. लग्न म्हणजे केवळ काही तासांची पूजा किंवा कार्य नसून कुटुंबासाठी एक उत्सव असतो. ज्यामध्ये अनेक विधी असतात. वधूला प्रत्येक विधी समारंभ कायम आठवणीत राहील असा बनवायचा असतो. अशा परिस्थितीत स्वतःला वेषभूषा करण्यापासून ते मेकअप आणि वेगळा लूक देण्यापर्यंत सर्व गोष्टींचा मुली खूप विचार करत असतात. लग्नात हळद, मेहंदी, संगीत, लग्न विधी ते पाठवणी पर्यंत नववधू वेगवेगळ्या रंगाचे कपडे निवडतात जेणेकरून लग्नाच्या अल्बममधील त्यांचा प्रत्येक लूक वेगळा दिसावा. ही एक चांगली कल्पना असू शकते. लग्नाच्या विधींमध्ये तुम्ही त्याच रंगाचे कपडे पुन्हा घातल्यास तुमच्या लूकमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे वेगवेगळे रंग निवडता येतात. याशिवाय, आपण आउटफिटची स्टाइल देखील बदलू शकता. तुमचे लग्नही जवळ आलं असेल आणि तुम्हाला तुमच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये सर्वात गोंडस वधू दिसायची असेल, तर तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. जाणून घेऊयात सविस्तर…

हळदीचे समारंभ
लग्नापूर्वी हळदी समारंभाचा मोठा कार्यक्रम असतो. या विधीमध्ये वधूच्या चेहऱ्याचा रंग आणखी खुलवण्यासाठी तिला हळद लावली जाते. मात्र, आता हा सोहळा मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा केला जातो. वधू पाटावर बसलेली असते. हळदी समारंभात मुली अनेकदा पिवळे कपडे परिधान करतात. तुमच्या हळदी समारंभासाठी तुम्ही शिफॉन किंवा इतर कोणत्याही फॅब्रिकची हलकी साडी कॅरी करू शकता. पिवळ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही चुनरी प्रिंट, फ्लोरल प्रिंटची साडी घालू शकता.

मेहंदी समारंभ
मेहंदी समारंभ हा लग्नाचा एक महत्त्वाचा सोहळा आहे, ज्यामध्ये नवऱ्याच्या नावाने नववधूच्या हातावर मेहंदी काढली जाते. या समारंभासाठी तुम्ही स्टायलिश तसेच आरामदायक ड्रेस कॅरी करू शकता. तुम्ही पेप्लम किंवा क्रॉप टॉपसोबत पलाझो घालू शकता. स्लीव्हलेस कुर्त्यासोबत तुम्ही शरारा घालू शकता. हिरवा किंवा कोणत्याही रंगाव्यतिरिक्त, तुम्ही मेहंदी फंक्शनवर निळ्या रंगाचा किंवा कोणत्याही गडद रंगाचा ड्रेस घालू शकता.

आणखी वाचा : Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

संगीत
आता लग्नसमारंभात संगीत सोहळ्याचं ग्रॅंड फंक्शन आयोजित केलं जातं. यामध्येही, वधू तिच्या बहिणी आणि मैत्रिणींसह एका ग्रूमिंग समारंभात भाग घेतात. संगीतासाठी तुम्ही जड अनारकली सूट, हलके छापील किंवा भरतकाम केलेला लेहेंगा घालू शकता. संगीतासाठी, बहु-रंगी, बेबी पिंक, पावडर ब्लू रंगाचे आउटफिट्स घालू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला लग्नाच्या निमित्ताने खूप जास्त कपडे घालावे लागतात, त्यामुळे संगीतात हलकासा मेकअप आणि आउटफिट्स घालून तुम्ही आराम करून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

लग्न
नववधू लग्नासाठी लेहेंगा किंवा वेडिंग ड्रेस घालते. तुमच्या आउटफिटचा रंग निवडून तुम्ही तुमचा लुक बदलू शकता. मात्र, कपड्यांच्या निवडीत जास्त प्रयोग करू नका. तुम्ही राजस्थानी, महाराष्ट्रीयन किंवा पंजाबी स्टाइल ब्राइडल लूकचा विचार करू शकता. सेलेब्सच्या ब्रायडल फोटोशूटच्या टिप्सही तुम्ही घेऊ शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wedding fashion tips haldi mehndi outfits ideas for bride wedding dresses dresses for bride indian wedding prp

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या