Turmeric Milk Benefits : हळदीचे दूध प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये एक लोकप्रिय पेय आहे. तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल, घसा खवखवत असेल किंवा सामान्यतः हवामान खराब असेल तेव्हा ते प्यावे, असे तुमच्या आईने किंवा आजीने तुम्हाला सांगितले असेलच. आयुर्वेदात या सोनेरी पेयाला शतकानुशतके बरे करण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची शक्ती म्हणून आदरणीय मानले जाते. ते खूप आरोग्यदायी असले तरी रात्री ते पिणे तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? त्वचेचे आरोग्य सुधारण्यापासून ते हाडे आणि सांधे मजबूत करण्यापर्यंत, दररोज रात्री हळदीचे दूध पिण्याचे फायदे ३० दिवसांपर्यंत जाणून घेऊया.

रात्री हळदीचे दूध पिण्याचे ५ आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

१. रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरीत्या वाढते – हळद कर्क्यूमिनने भरलेली असते, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहकविरोधी संयुग. दररोज सेवन केल्याने ते तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास आणि त्याच्या नैसर्गिक संरक्षणास बळकट करण्यास मदत करते. पोषणतज्ज्ञ रूपाली दत्ता स्पष्ट करतात की, कोमट दूध आणि हळदीचे मिश्रण सर्दी आणि घशातील खवखव कमी करू शकते, ज्यामुळे हंगामी बदल किंवा फ्लूच्या हंगामात झोपण्याच्या वेळी ते एक आदर्श पेय बनते.

२. चांगली झोप येते – हळदीचे दूध बहुतेकदा नैसर्गिक झोपेसाठी मदत म्हणून वापरले जाते. दुधातील अमिनो आम्ल ट्रिप्टोफॅन तुमच्या शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन – विश्रांती आणि झोपेला प्रोत्साहन देणारे हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. दरम्यान, हळद मज्जासंस्था शांत करण्यास आणि तणावाशी संबंधित जळजळ कमी करण्यास मदत करते. एकत्रितपणे, ते आराम करणे आणि रात्रीची अधिक शांत झोप घेण्यास सोपे करतात.

३. त्वचेचे आरोग्य सुधारते – त्वचा चमकदार होण्यासाठी त्याची पेशी आतून सकारात्मकरीत्या कार्यरत होणे आवश्यक असते आणि हळदीचे दूध तुम्हाला ते साध्य करण्यास मदत करू शकते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्व, निस्तेजपणा व मुरमे निर्माण करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढतात. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) नुसार, हळदीचे दूध नियमितपणे प्यायल्याने जळजळ कमी होते आणि रंग उजळतो.हळदीचे दूध नियमितपणे एक महिना प्यायल्यानंतर काही लोकांना त्यांची त्वचा अधिक हायड्रेटेड वाटत असल्याचेही लक्षात येते.

४. हाडे आणि सांधे मजबूत होतात – दूध नैसर्गिकरीत्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने समृद्ध आहे, जे दोन्ही मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे. मिश्रणात हळद घाला आणि तुम्हाला एक शक्तिशाली दाहकविरोधी मिश्रण मिळेल, जे सांधेदुखी, कडकपणा आणि संधिवाताशी संबंधित अस्वस्थता कमी करण्यास मदत मिळते. जर तुम्हाला वारंवार स्नायुदुखीचा त्रास होत असेल किंवा तुम्हा बराच वेळ बसून राहावे लागत असेल, तर रात्री एक कप हळदीचे दूध घेत जा. त्यामुळे तुम्हाला कालांतराने अधिक लवचिक आणि वेदनामुक्त वाटण्यास मदत मिळू शकते.

५. पचन व आतड्यांच्या आरोग्यास समर्थन मिळते – हळद पित्त उत्पादनास उत्तेजन देते, ज्यामुळे पचनास मदत होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कार्यक्षमतेने विरघळू लागते. हळद पचनसंस्थेला शांत करण्यासदेखील मदत करते, पोटफुगी, आम्लता व अपचन कमी करते. हळदीचे दूध झोपण्यापूर्वी घेतल्यास, ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी रात्रभर हळुवारपणे कार्य चालू राहते, ज्यामुळे तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटण्यास मदत मिळते.