Why Do People Put Garlic Under the Pillow: लसूण जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरला जातो. लोक बऱ्याचदा अन्नाची चव वाढविण्यासाठी लसणाचा वापर करतात. लसूण आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. लसूण ही एक औषधी वनस्पती आहे, ज्याचा उपयोग मुख्यतः मसाल्यांमध्ये, आरोग्योपचारांमध्ये आणि पारंपरिक औषधांमध्ये होतो. लसूण कार्बोहायड्रेट, तांबे, फॉस्फरस, आहारातील फायबर, प्रथिने, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी, बी6, मँगनीज, कॅल्शियम, सेलेनियम, फायबर यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवून झोपल्याने काय होते, हे वाचून तुम्हालाही वाटेल, लसूण आणि झोप याचा काय संबंध? पण हा उपाय प्राचीन आयुर्वेदांमध्ये वापरला जात आला आहे. चला तर मग नेमकं काय होतं जाणून घेऊयात…

दैनंदिन आयुष्यात लसूण हे फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित आहे असं अनेकांना वाटतं. पण, लसणाची एक पाकळी रात्री झोपताना उशीखाली ठेवली तर ती केवळ झोपच नाही, तर आरोग्यही सुधारते असं आयुर्वेद आणि काही घरगुती उपचारांवर विश्वास ठेवणारे सांगतात. उशीखाली लसूण ठेवण्यामागचं गुपित काय? आपणही आज जाणून घेऊ…

१. शांत झोप मिळते

आजकाल वेळेवर झोप न लागणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. मानसिक ताण इतका वाढला आहे की लोक अंथरुणावर झोपताना बाजू बदलत राहतात. लसणातील सल्फरयुक्त संयुगे आणि त्याचा विशिष्ट वास मेंदूवर सौम्य झोपेचा प्रभाव टाकतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. लसणामध्ये व्हिटॅमिन बी6 असते. हे झोप न येण्यासंबंधित आजार निद्रानाशमध्ये अत्यंत उपयुक्त असते.

२. दमा आणि श्वासाच्या त्रासात आराम

लसणात ‘ॲलिसिन’ नावाचे एक संयुग असते, जे जंतू आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करते. लसणाच्या वासामुळे काही लोकांना नाक मोकळं वाटतं आणि श्वास घेणं सोपं जातं.

३. नकारात्मक ऊर्जा दूर जाते (प्राचीन समज)

काही लोकांच्या मते, लसूण नकारात्मक ऊर्जा, वाईट स्वप्न यांना दूर ठेवतं; विशेषतः ग्रामीण भागात यावर विश्वास आहे. म्हणून अनेक लोक उशीखाली लसूण ठेवतात.

४. डास आणि कीटक दूर राहतात

जर रात्री झोपताना डास, माश्या किंवा इतर कीटक तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही उशाखाली लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात. जुन्या काळात लोक हा उपाय वापरत असत. लसणाच्या सुवासामुळे घरातील किडे उशीजवळ येत नाहीत, असं अनेकांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून, ‘लोकसत्ता’ त्याची पुष्टी करीत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)