सध्या बॉलीवूड गाजवणारी आलिया भट्ट आणि करीना कपूर या दोघींनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या आठव्या पर्वातील चौथ्या भागात हजेरी लावली होती. या मुलाखतीसाठी दोघीनींही प्रचंड सुंदर असे कपडे परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आलिया भट्टने पायाजवळ थोडा कट असलेला असा चमकदार गाऊन घातला होता. तर करीनाने, अतिशय सुंदर असा पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि मॅक्सी स्कर्ट घातलेला होता. या दोन्हीही अभिनेत्री आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालतात; पण सोबत त्या आपल्या अशा भन्नाट फॅशननेदेखील चाहत्यांची मनं जिंकतात. आलिया आणि करीना या दोघींच्या सध्याच्या बहुचर्चित लूकबद्दल थोडी माहिती घेऊ. त्यांनी घातलेल्या ड्रेसला काय म्हणतात, त्याचा रंग कोणता, त्याची किंमत किती याबद्दल जाणून घेऊ.

आलिया भट्टचा लूक

आलिया भट्टने चॉकलेटी-ब्राऊन रंगाचा ‘की होल’ [keyhole] गळा असणारा मॅक्सी ड्रेस घातला आहे. या ड्रेसला लांब हात असून, संपूर्ण कपड्यावर सेक्विनचे [sequin] काम केले आहे. हा लुक मिळवण्यासाठी सेलिब्रेटी फॅशन स्टायलिस्ट प्रियांका कपाडिया यांनी साह्य केले असून, यावर फारसे दागिने घातल्याचे दिसत नाही. या संपूर्ण ड्रेसला शोभतील अशा काळ्या रंगाच्या चमकदार हिल्स घालून हा लूक पूर्ण केला आहे.

हेही वाचा : दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाऊन शरीर झालेय सुस्त? पाहा हे सात सोपे उपाय करतील तुम्हाला तंदुरुस्त

पण इतक्या सुंदर कपड्याची किंमत तरी किती? आलिया भट्टचा हा ड्रेस ‘१६ अर्लिंग्टन’ [16Arlington] या ब्रँडचा असून याची किंमत साधारणपणे, १.२८ लाख इतकी आहे. पुनित साईनी या मेकअप आर्टिस्टच्या मदतीने, आलिया भट्टने तिच्या लूकला साजेसा न्यूड मेकअप केला आहे; ज्यामध्ये डोळ्यांवर हलक्या रंगाचे आयशॅडो, ओठांना हलक्या रंगाची लिपस्टिक, आणि चमकदार चेहऱ्यासाठी हायलायटरचा वापर केला आहे. अमित ठाकूर यांच्या साह्याने केसांची सुंदर आणि नाजूक रचना केली आहे. त्यासाठी केसांना हलके वळण देऊन मोकळे ठेवण्यात आले आहे. या सर्व गोष्टींनी एकत्रितपणे या लूकला अतिशय सुंदर दिसण्यास मदत केली आहे.

करीना कपूरचा लूक

करीना कपूरने, पांढऱ्या रंगाचा आणि लांब हातांचा घट्ट ऑफ शोल्डर टॉप घातला असून, त्याखाली अंगासरशी बसणारा लांब, मॅक्सी स्कर्ट घातलेला आहे. करीनाने घातलेला हा काळा-पांढरा ड्रेस दिसायला अतिशय सुंदर आहे. करीना कपूरचा हा ड्रेस, सोलेस लंडन या ब्रँडचा असून, त्याची किंमत ही साधारण ७४ हजार इतकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तान्या घारवी या सेलिब्रेटी फॅशन आर्टिस्टच्या साह्याने करीना कपूरचा हा लूक तयार केला गेला आहे. या लूकसाठी करीना कपूरनं कपड्यांना साजेल असे मोठे, सोनेरी कानातले घातले असून, सोबत हाय हिल्सदेखील घातल्या आहेत. सावलीन कौर मनचंदा या मेकअप आर्टिस्टसह डोळ्यांना हलक्या रंगाचे आयशॅडो, डोळ्यात काजळ, डोळ्यांवर काळे आयलायनर, ओठांना हलक्या रंगाची चमकदार लिपस्टिक आणि चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हायलायटरचा वापर करून संपूर्ण मेकअप केलेला आहे. मितेश रजनी यांच्या मदतीने करीनाने केशरचना केलेली आहे. तिने आपल्या केसांना सेट करून, तसेच मोकळे सोडलेले आहेत.