Jethalal Weight Loss : ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल म्हणून ओळखले जाते. दिलीप जोशी यांनी त्यांचे वजन कमी करण्याबाबतचा अनुभव सांगितला. एकेकाळी त्यांनी दीड महिन्यात १६ किलो वजन कसे कमी केले होते याबाबतचा खुलासा केला. वजन कमी करण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेल्यांना हे खरंच शक्य आहे का, असा प्रश्न पडला असेल.
जेव्हा जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांनी दीड महिन्यात १६ किलो वजन कमी केले होते
१९९२ च्या गुजराती चित्रपट ‘हुन हुंशी हुंशीलाल’मध्ये काम करण्यासाठी त्यांनी वजन कमी केले होते. त्याबाबत २०२३ मध्ये मॅशेबल इंडियाला माहिती देताना त्यांनी सांगितले, “ते खूप मजेदार दिवस होते. तेव्हा सूर्य मावळत होता आणि थोडासा पाऊस पडत असे. ढग खूप सुंदर दिसत होते. तेव्हा मी कामावर जायचो, स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलायचो आणि मरीन ड्राइव्ह ओलांडून (हॉटेल) ओबेरॉयपर्यंत पावसात धावायचो आणि परत जायचो. मी संपूर्ण प्रवासात जॉगिंग करायचो आणि त्यासाठी मला ४५ मिनिटे लागायची. या काळात दीड महिन्यात मी १६ किलो वजन कमी केले होते.”

४५ दिवसांत १६ किलो वजन कमी करणे खरचं शक्य आहे का?

याबाबत जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञाचे मत जाणून घेतले. याबाबत माहिती देताना इव्हॉल्व्ह फिटनेसचे संस्थापक व पोषणशास्त्रातील तज्ज्ञ असलेले वरुण रतन सांगतात,” ४५ दिवसांत १६ किलो वजन कमी करणे निश्चितच प्रेरणादायी आहे आणि ही कृती व्यक्तीची शिस्त दर्शवते. “ दीड महिन्यात १६ किलो म्हणजे दररोज सुमारे ३५० ग्रॅम शरीराचे वजन कमी करण्याइतके आहे. दररोज ३५० ग्रॅम वजन कमी करणे हे खूपच कठीण वाटू शकते; परंतु ज्यांचे वजन जास्त आहे (उदा. १०० किलोपेक्षा जास्त) त्यांच्यासाठी ते अधिक व्यवहार्य अथवा योग्य पद्धत आहे. कारण- १०० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या व्यक्तीचे शरीर जास्त ऊर्जा साठवून ठेवते, ज्यामुळे जलद वजन कमी करणे शक्य होते; विशेषतः लक्षणीय कॅलरीजची कमतरता आणि नियमित व्यायामाच्या मदतीने हे शक्य होते. कमी कॅलरीजचा आहार आणि दररोज धावण्यामुळे निर्माण होणारी आक्रमक कॅलरीजची कमतरता कमीत कमी सुरुवातीच्या काळात इतक्या जलद गतीने कमी करण्यास मदत करू शकते.”

“असे असले तरी या प्रकारे वजन कमी करणे, प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य ठरू शकत नाही.

“७५ किलो वजन असलेल्या व्यक्तीचे वजन त्याच गतीने कमी होणार नाही. आणि जरी या पद्धतीमुळे वजन कमी झाले तरी यामुळे स्नायू आणि हाडांच्या वस्तुमानात घट होते आणि पौष्टिक घटकांची कमतरतादेखील उद्भवू शकते,” असे रतन यांनी स्पष्ट केले.

“जेव्हा शरीराला बराच काळ कमी अन्न दिले जाते किंवा जेव्हा शरीराला बराच काळ पुरेसे पोषक घटक मिळत नाहीत, तेव्हा ते ऊर्जेसाठी शरीर स्वतःचे स्नायू, फॅट्स किंवा इतर ऊतींचा ऊर्जेसाठी वापर करू लागते आणि मूलभूत शारीरिक कार्ये चालू ठेवण्यासाठी हाडांमधून आवश्यक पोषक घटक (जसे की कॅल्शियम) शोषून घेते. त्यामुळे स्नायूंचे नुकसान होऊ शकते आणि हाडे कमकुवत होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.