Wrist Band Benefits: आजकाल लोक फीटनेसला महत्त्व देत असल्याचे पाहायला मिळते. बहुतांश लोक जिममध्ये जाऊन वर्कआउट करत असतात. जिममधील मशीन्सच्या सहाय्याने व्यायाम करण्यासह वेट लिफ्टिंग करणेदेखील फायदेशीर असते. वेट्स उचलल्याने मसल्स बनतात, शरीर मजबूत बनते असे म्हटले जाते. बॉडी बिल्डींग करणारे लोक सुद्धा नियमितपणे वेट लिफ्टिंग करत असतात. जर तुम्ही जिममध्ये जात असाल, तर तुम्ही वेट लिफ्टिंग केले असेल किंवा कोणालातरी करताना पाहिले असेल. वजन उचलणारी व्यक्ती ही नेहमी दोन्ही हातांच्या मनगटावर Wrist-band घालत असल्याचे तुम्हीही पाहिले असेल. पण तुम्हाला ते बॅन्ड हातात का घातले आहे असा प्रश्न पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज देणार आहोत.

मनगटाला इजा होत नाही.

वेट लिफ्टिंग करताना हाताला खास करुन मनगटाला इजा होऊ शकते. त्यावर ताण, दबाव आल्याने हात दुखायला लागू शकतो. हे घडू नये म्हणून रिस्ट बॅन्ड घालते जातात. बॅन्डमुळे मनगटांना वजन उचलताना सपोर्ट मिळतो. ज्या लोकांच्या मनगटाजवळचे स्नायू काहीसे कमकुवत असतात, अशा लोकांना रिस्ट बॅन्डची मोठी मदत होते. वजन उचलताना झटका लागल्यावर येणारा ताण बॅन्डमुळे कमी होतो आणि मनगटाला दुखापत होत नाही.

how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

चांगली ग्रिप मिळते.

जेव्हा आपण डंबल्स दोन्ही हातांनी पकडून उचलण्याचा प्रयत्न करत असतो, त्या वेळेस रिस्ट बॅन्डमुळे हातांना ग्रिप मिळते. मनगटाला योग्य प्रमाणात सपोर्ट मिळाल्याने वेट्स हातातून निसटत नाहीत. थोडक्यात रिस्ट बॅन्डमुळे वेस्ट उचलताना संतुलन राखण्यास मदत होते असे आपण म्हणू शकतो.

आणखी वाचा – व्यायामादरम्यान श्वास घेण्यास त्रास होतोय? मग हे दम्याचे लक्षण तर नाही ना, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

स्नायूंवर कमी ताण येतो.

वजन उचलताना हाताच्या स्नायूंवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असतो. काही वेळेस स्नायू इतके ताणले जातात, की अनेक आठवड्यांसाठी व्यायाम करणे शक्य होत नाही. मनगटावर रिस्ट बॅन्ड असल्यावर स्नायू ताणण्याचा धोका कमी होतो. परिणामी स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता देखील कमी-कमी होत जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञान यावर आधारित आहे.)