How To Cook Chicken: मांसाहारी लोकांसाठी चिकन हा आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. अनेकांना चिकन खायला आवडते. आपण सर्वजण चिकन बाजारातून आणल्यावर धुतो. जर तुम्हीही असं करत असाल तर आजच थांबवा. चिकन बनवण्यापूर्वी चुकूनही धुवू नका. त्यामुळे तुमच्या शरीराचे खूप नुकसान होऊ शकते.

द कॉन्व्हर्सेशनच्या अहवालानुसार, जगभरातील विविध फूड सिक्योरिटी अथॉरिटी आणि रेग्युलेटरी शिफारस करतात की चिकन शिजवण्यापूर्वी धुवू नये. कारण त्यामुळे स्वयंपाकघरात बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. चिकन न धुता शिजविणे कधीही चांगले आहे. ही पद्धत सर्वात सुरक्षित मानली जाते. परंतु बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही. एका नव्या अभ्यासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

नवीन अभ्यासात काय समोर आले?

बाजारातून चिकन आणल्यावर ते धुणे सामान्य आहे. आपण प्रत्येकजण ते करतो. पण ऑस्ट्रेलियाच्या फूड सिक्योरिटी इन्फॉर्मेशन काउंसिलने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ऑस्ट्रेलियातील अर्धी लोकं चिकन शिजवण्यापूर्वी चिकन धुतात. सुमारे २५ टक्के ग्राहक चिकन धुतात.

( हे ही वाचा: ‘या’ पदार्थांमुळे हाता- पायांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच खाणे थांबवा)

संशोधनानुसार, साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर या दोन महत्त्वाच्या जीवाणूंमुळे अन्नजन्य रोग होतात. हे दोन्ही जीवाणू कोंबडीच्या मांसावर आढळतात. जेव्हा आपण चिकन धुतो त्यावेळी हे जिवाणू आजूबाजूला पसरतात आणि आजारांचा धोका वाढतो.