World TB Day 2023: क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. क्षयरोग प्राथमिक स्तरावर असताना त्यावर योग्य उपचार करणे योग्य मानले जाते. असे केल्याने क्षयरोग बरा होऊ शकतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेद्वारे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांमार्फत क्षयरोगासंबंधित माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या विषाणूचा शोध लावला होता.

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) या विषाणूमुळे पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, क्षयरोग हा संसर्गजन्य आजार लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. २०१८ मध्ये या आजाराच्या प्रभावामुळे तब्बल १.५ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक पातळीवर उपाय केल्यास हा आजार होण्याचा धोका कमी होतो असे म्हटले जाते. यासाठी जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतील. क्षयरोगाचा धोका टळला जावा यासाठी कोणत्या सवयी बदलाव्यात याबद्दलची माहिती देणार आहोत.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

स्वच्छता राखणे

क्षयरोग संसर्गजन्य प्रकारचा रोग आहे. स्वच्छता राखल्यामुळे यापासून स्वत:चा बचाव करता येतो. वारंवार हात धुणे, खोकताना आणि शिंकताना तोंड-नाक झाकणे अशा सवयींमुळे क्षयरोगाचा धोका टाळला जातो.

सकस आहार घ्यावा

क्षयरोगाच्या विषाणूंशी लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे आवश्यक असते. सकस आहारामुळे रोगप्रतिकार शक्तीला चालना मिळते. विविध फळं, भाज्या, कडधान्ये, शक्य असल्यास मांस, अंडी, मासे यांचा आहारामध्ये समावेश असावा.

पुरेशी झोप घ्यावी

रोगप्रतिकार शक्तीला आधार देण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. निद्राचक्र पूर्ण झाल्याने संसर्गापासून लढण्यास मदत होते. शरीराला योग्य प्रमाणामध्ये विश्रांती मिळावी यासाठी दररोज किमान सात ते आठ तास झोप घ्यावी.

आणखी वाचा – ‘PCOD’ ची समस्या आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून रहाल दूर! ‘ही’ योगासने नक्की करुन पाहा

ताणतणावाचे व्यवस्थापन करावे

तीव्र ताणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. असे झाल्यास संसर्गजन्य आजार बळावू शकतात. दैनंदिन आयुष्यामध्ये ध्यान, योग, श्वासोच्छवासाचे व्यायाम यांचा समावेश करुन ताणाचे व्यवस्थापन करता येते.

नियमितपणे व्यायाम करावा

दररोज काही तास व्यायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेत या सवयीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी संसर्गाचा धोका कमी होतो.

धुम्रपान न करणे

धुम्रपान केल्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे क्षयरोग संसर्ग होण्याचा धोका संभवतो. धुम्रपानाच्या सवयीमुळे रोगप्रतिकार शक्तीदेखील कमकुवत होते. ही सवय सोडल्याने क्षयरोगासारखे अन्य श्वसनाचे आजारांपासून स्वत:चा बचाव करु शकता.

आणखी वाचा – विश्लेषण: करोनाची लक्षणं समजून तुम्ही टीबीकडे दुर्लक्ष तर करत नाही आहात ना? कशी ओळखाल क्षयरोगाची लक्षणं? जाणून घ्या!

लसीकरणाची मदत घ्या

बॅसिलस कॅल्मेट-गुएरिन (Bacillus Calmette-Guérin) ही लस क्षयरोगाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यात मदत करु शकते. या गंभीर आजाराचा उच्च प्रादुर्भाव असलेल्या देशांतील लहान मुलांसाठी याची शिफारस केली जाते. ही लस १०० टक्के प्रभावी नसल्याने प्रौढांसाठीच्या उपचारामध्ये हीचा वापर करणे टाळले जाते.

लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी

दोन किंवा त्यापेक्षा जास्त आठवडे खोकला व ताप येणे हे क्षयरोगाचे प्राथमिक लक्षण आहे असे म्हटले जाते. या लक्षणांचा अनुभव आल्यास त्वरीत संसर्गासंबंधित चाचणी करुन खात्री करुन घ्यावी आणि वैद्यकीय मदत घ्यावी.